Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार; मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित

पीडितेच्या मैत्रिणींनी ही घटना पालकांना सांगितली. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर व घटनेची शहानिशा झाल्यानंतर पीडितेच्या आजीने व काही पालकांनी पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 09, 2025 | 02:00 PM
मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

Follow Us
Follow Us:

इगतपुरी : तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना केल्याचे उघडकीस आली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार (दि. ७) रोजी उघडकीस आले आहे.

याबाबत पीडितेच्या कुटुंबियानी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत शुक्रवारी रात्रीच संशयित मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे टाकेद बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात ह्या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शनिवार (दि. ८) भारत सर्व सेवा संघ संचलित न्यु इंग्लीश स्कूल व ज्युनियर कॉलेज (कला व विज्ञान) टाकेद बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी शाळेवर एकच गर्दी केली होती.

संबधित आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. तसेच संस्थेची शासन मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

घरी कोणी नसताना अत्याचार; संशयित पोलिसांच्या ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर व पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी जमावाला शांत करून संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी (दि. ७) दुपारी घरकामाच्या नावाखाली वर्गशिक्षक गोरख जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून टाकेद बुद्रुक येयील मुख्याध्यापकाच्या घरी नेले. मुख्याध्यापक तुकाराम साबळे याच्या घरातील कुटुंब गावातीलच एका लग्नासाठी साकुर फाटा येथे गेले होते. या संधीचा फायदा घेऊन तुकाराम साबळे याने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर मुलीला घरी पाठवून दिले. पीडितेने हा प्रकार मैत्रिणींना सांगितला.

शहानिशा करून पोलिसांत तक्रार

पीडितेच्या मैत्रिणींनी ही घटना पालकांना सांगितली. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर व घटनेची शहानिशा झाल्यानंतर पीडितेच्या आजीने व काही पालकांनी पोलीसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तक्रार दाखल करून तुकाराम साबळे व शिक्षक जोशी याला अटक केली.

टाकेद बुद्रुक येथील घटना निंदनीय

टाकेद बुद्रुक येथे घडलेली घटना निंदनीय असून, या घटनेतील संशयित मुख्याध्यापक आणि शिक्षकाला निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून संबंधितांना बडतर्फ करण्यात येईल.

  • दादा भुसे, शिक्षणमंत्री.

Web Title: Principal abused of student principal and teachers suspended nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • crime news
  • Igatpuri Crime

संबंधित बातम्या

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले
1

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
2

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
3

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.