Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Buldhana Deulgaon Raja Crime News देऊळगाव राजात कव्वालीच्या कार्यक्रमातील बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागून दोन गटांत हाणामारी झाली, ज्यात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 07:10 PM
Buldhana Deulgaon Raja Crime News

Buldhana Deulgaon Raja Crime News

Follow Us
Follow Us:
  • देऊळगाव राजा हत्याकांड
  • नगरसेवकासह दोघांचा मृत्यू
  • दोन्ही गटांतील २० जणांना अटक
देऊळगाव राजा: शहरातील प्रतापनगर-भोलेशहा दर्त्यांजवळ दोन गटात झालेल्या वादाला हिंसक वळण लागून दोघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी खुनाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी आतापर्यंत २० आरोपींना अटक केली आहे. यात दोन्ही गटातील ३६ ते ४० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कव्वालीच्या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटात हिंसक संघर्षात झाले, लाठ्या, काठ्या आणि तलवारीने हाणामरी झाली. यात शिवसेना शिंद गटाचे नगरसेवक शेख अनवर उर्फ अनु शेख अली (४२, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आसीफ उर्फ आरीफ हारून पठाण (३५, रा. देऊळगाव राजा) गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान जालना येथे मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शेख अतिक शेख उमर (३३. रा. प्रतापनगर, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेख अकीब शेख पाशु याच्यासह इतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप आहे. आरोपींनी चाकू, लाकडी दांडा, कुऱ्हाड आदी हत्यारे हातात घेऊन नातेवाईकांच्या घरात तसेच घराबाहेर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात तक्रारदाराचे नातेवाईक आसीफ पठाण यांच्यावर चाकू व कुऱ्हाडीने गंभीर वार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य काही व्यक्तींनाही मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरदुसऱ्या गटाकडून शेख मुजाहिद शेख अली (४६, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीनुसार, शाहरुख खान अहमद खान याच्यासह इतर आरोपींनी कट रचून तक्रारदार व त्याच्या भावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपींनी काठ्या, चाकू व लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात तक्रारदाराचा भाऊ शेख अनवर उर्फ अनु शेख अली (४२, रा. हाकीम कॉलनी, देऊळगाव राजा) गंभीर जखमी झाले. त्यांचाही मृत्यू झाला. तसेच तक्रारदार व साक्षीदारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता कुवारे देऊळगाव राजा पोलिस ठाणे करीत आहेत.

शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

घटनेची गंभीरता व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करणे आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या, घटनेनंतर देऊळगाव राजा शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. पॉलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक आणि क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे.

दोन्ही मृतांवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

देऊळगाव राजा येथील दोन गटांतील हिंसक संघर्षात मृत्यू झालेल्या आसीफ उर्फ पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणताही आरीफ हारून पठाण आणि शेख अनवर उर्फ अनु शेख अली यांच्या पार्थिवावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक व क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले होते. शहरातील संवेदनशील भागातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

Web Title: Buldhana deulgaon raja double murder case 20 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • crime news

संबंधित बातम्या

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
1

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
2

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
4

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.