पुणे तळेगाव नजीक रस्ते अपघातात सायबर सेक्यूरीटी एक्सपर्टचा मृत्यू
Pune Accident News : सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा पुणे नजीक तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.
बोरीवली येथे राहणारा सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचा पुणे नजीक तळेगावनजीक अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सायबर सेक्यूरीटी एक्सपर्ट तरुणाचे नाव सचिन महेंद्र देढिया (४१) असे आहे.
देढीया हे बोरीवली येथे राहत होते. ते सायबर संदर्भात एक कंपनी चालवित होते. त्याचबरोबर सायबर सेक्यूरीटी आणि डिजिटल फॉरेन्सीक एक्सपर्ट होते. ते पोलिस खात्यातील पाेलिसांना सायबर सेक्यूरीटी विषयी मार्गदर्शन करायचे. आज त्यांचे पुणे येथील इंडियन चार्टड अकाऊंटंट संस्थेत कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याला जाण्याकरीता निघाले हाेते. त्यांच्या कारला पुणे तळेगावनजीक अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात कारचा चालकही मृत्यूमुखी पडला आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे ‘सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे’ या विषयावर गृह मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्रावर भर दिला.
सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी, सायबर हेल्पलाइन ‘१९३०’ चे महत्त्व वाढवणे आणि लोकांना त्याच्या वापराबद्दल जागरूक करणे महत्वाचे आहे. त्यांनी सुचवले की सायबर स्पेसमधील सॉफ्टवेअर, सेवा आणि वापरकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांनीच सायबर फसवणूक पूर्णपणे रोखता येईल. तसेच सायबर सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण केवळ सरकारद्वारेच नाही तर सर्व सायबरस्पेसशी संबंधित संस्था आणि व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नांद्वारे देखील शक्य आहे. सायबर फसवणूक आणि गुन्ह्यांविरुद्धची ही संयुक्त लढाई असेल ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासाव्यतिरिक्त समाजात जागरूकता देखील आवश्यक आहे.
Pune Crime News : पुण्यात घरफोड्यांचा उच्छाद, दोन दिवसांत सहा घटना; आंबेगावात तीन घरं फोडली