संग्रहित फोटो
यवत : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड पोलीस ठाणे हद्दीतील भीमनगर येथे एका लहान मुलीचा विनयभंग करून जातिवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बाबा चांद शेख ( रा. भीमनगर, दौंड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री ८-३० वाजताच्या दरम्यान पीडित मुलीची आई गवळी वस्ती येथून घरी भीमनगर येथे त्यांच्या घरासमोर गेल्या असता, तेथे घरासमोर थांबलेल्या फिर्यादीच्या लहान मुलीला घरा शेजारील राहणारा बाबा चांद शेख याने लहान मुलीस वाईट हेतूने मिठी मारलेली फिर्यादीने पाहिली, तेव्हा पीडित मुलगी घाबरून रडत रडत दोन्हीं हाताने शेखला विरोध करीत होती. हे पाहताच फिर्यादी बाबा, तिला सोड असे म्हणत जोरात ओरडल्या.
दरम्यान यावेळी आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन तो तिथून पसार झाला. फिर्यादीने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बाबा शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास विभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत.
तरुणीवर पोलिसाचा अत्याचार
कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरु असलेल्या तरुणीवर पोलिसाने अत्याचार केला आहे. पोलिस हा तरुणीचा जाब घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने छातीवरून हात फिरवत तिच्यावर अत्याचार केला. पोलिसाच्या या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन दिलीप घाटगे असे तरुणीचे छेड काढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित तरुणी ही अल्पवयीन आहे. या तरुणीने हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी हाॅस्पिटल मध्ये जबाब घेण्यास गेलेला पोलीस कर्मचारी चेतन घाटगे याने अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आहे.