Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा

सायंकाळी साडेपाचची वेळ... तरुण दुचाकीवरून जात असतानाच अचानक तीन रिक्षा आणि कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. आंबेठाणमधील या धक्कादायक अपहरणाने पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने अखेर पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचवले आणि अवघ्या २४ तासांत तरुणाची सुखरूप सुटका झाली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 07, 2026 | 03:52 PM
सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा

सायंकाळी दुचाकीवरून निघाला अन् अचानक गायब! तीन रिक्षा-कारच्या रहस्याचा पोलिसांनी लावला छडा

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोडीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून तरुणाचे दुचाकीसह अपहरण
  • सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून यवतमाळमधून आठ जणांना अटक
  • पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या २४ तासांत अपहृत तरुणाची सुखरूप सुटका
 

पुणे : ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्याच्या आंबेठाण परिसरात दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाचे काही व्यक्तींनी तीन ऑटो रिक्षा आणि एका कारच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. घटनेनंतर एका ३० वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस आणि म्हाळुंगे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी

अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आंबेठाण आणि परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. संशयित कोणत्या दिशेने गेले, त्यांच्यासोबत कोणती वाहने होती, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणचे फुटेज खंगाळले. त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले.

हेही वाचा: Crime News: जेवण बाहेरून मागवलं म्हणून पतीचा संताप; पत्नीवर कात्रीने वार, पुण्यात धक्कादायक घटना

शिक्रापूरमधून तिघांना ताब्यात

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला अमोल, सचिन आणि नीलेश या तिघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांना या अपहरणामागील कारण तसेच अन्य संशयित आणि अपहरण करण्यात आलेल्या तरुणाबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

उचलीच्या पैशाच्या वादातून अपहरण

पोलिसांच्या तपासात ऊसतोडीच्या कामासाठी घेतलेल्या उचलीच्या पैशाच्या वादातून या तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचे समोर आले. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला वाद टोकाला गेल्यानंतर संबंधित तरुणाला दुचाकीसह जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती तपासात उघड झाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक वेगाने सुरू केला.

यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस आणि म्हाळुंगे पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे यवतमाळ जिल्ह्यात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली. अमोल रामराव राठोड (वय २९), सचिन रामराव राठोड (२५), नीलेश संतोष राठोड (२७), शुभम प्रल्हाद जाधव (२५), संदीप गुलाब राठोड (४२), इंदल थावरा जाधव (४०, सर्व मूळ रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), राजू बापूराव चव्हाण (४४, रा. वरूड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि संदीप उदयभान जाधव (३२, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

कार, तीन रिक्षांसह दुचाकी जप्त

पोलिसांनी या कारवाईदरम्यान अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत तरुणाची मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या वाहनांच्या आधारेही पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. अपहरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाबाबत संशयितांकडे चौकशी सुरू आहे.

अवघ्या २४ तासांत तरुणाची सुखरूप सुटका

पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे अपहरण झालेल्या तरुणाची अवघ्या २४ तासांत सुखरूप सुटका करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. ऊसतोडीच्या उचलीच्या पैशाच्या वादातून घडलेल्या या अपहरणाच्या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी आणि म्हाळुंगे पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Pune ambethan yavatmal sugarcane worker money dispute kidnapping case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Kidnapping news
  • pune crime case
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर  म्हणाला …
1

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
2

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
3

कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड
4

हत्येपूर्वी दोन हॉटेलमध्ये मुक्काम; सियाच्या गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये लोहगड, ट्रेकिंग अपघातांसह विविध कीवर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.