Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग; खासगी रुग्णालयांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2025 | 03:10 PM
मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूनंतर महापालिकेला आली जाग; खासगी रुग्णालयांना दिले ‘हे’  महत्वाचे निर्देश
Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र डिपॉझिट न भरल्याने त्या गर्भवती महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्या महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणानंतर पुणे महानगरपालिका सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गभर्वती महिलेचा डिपॉझिट न भरल्याने उपचारांअभावी मृत्य झाला. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. पुणे महानगरपालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना डिपॉझिट घेऊ नये अशी नोटीस बजावली आहे. आधी रुग्णावर उपचार करावेत आणि मग त्यांच्याकडे पैसे मागावेत असे आदेश या नोटिसीमधून देण्यात आले आहेत.

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा

दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.

डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

Big Breaking: मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा

वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण व त्यामुळे रूग्णालाय प्रतिमेला निर्माण होणारी हानी पाहता घैसास यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. रूग्णसेवा हे माझे प्रथम कर्तव्य असून, त्यामध्ये अडचण येऊ नये हीच माझी भूमिका असल्याचे डॉक्टर घैसास म्हणाले. सध्या मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकारावर चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू

सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.  दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.

 

Web Title: Pune corporation give instructions to all private hospital do not take deposit after mangeshkar hospital woman death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • crime news
  • deenanath mangeshkar hospital
  • Pune Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.