Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी झाली तरी Pune Railway Station वरून गर्दी हटेना! 13 दिवसांत 22 लाख प्रवासी तर पुणे विभागाने…

Pune Railway Station: प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ रांगेत थांबावे लागू नये, यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर सहा, तर हडपसर स्थानकावर पाच अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 16, 2026 | 07:17 PM
दिवाळी संपली, तरी रेल्वे स्थानकावरील गर्दी हटेना

दिवाळी संपली, तरी रेल्वे स्थानकावरील गर्दी हटेना

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी संपली, तरी रेल्वे स्थानकावरील गर्दी हटेना
  • तेरा दिवसांत पुणे रेल्वे स्थानकावरून २२ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा
  • ५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन
Pune Railway Station: दिवाळीची सुट्टी संपून कामावर परतणाऱ्यांची लगबग सुरू झाली असली, तरी पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी अद्याप कायम आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने गावी गेलेले नागरिक आता पुण्यात परतत असल्याने स्थानकावर प्रवाशांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे. १ ते १३ नोव्हेंबर या तेरा दिवसांच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरून २२ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन केले आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. मात्र, सुट्ट्या संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी स्थानकावर गर्दी वाढली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी व्यापक गर्दी व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

गोरखपूर, हजरत निजामुद्दीन, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, नागपूर, कलबुर्गी आणि गाझीपूर सिटी यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुणे, हडपसर आणि खडकी स्थानकांवर तिकीट तपासणीसाठी एकूण ५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Pune News: खासगी ट्रॅव्हल्सच्या दरांवर नियंत्रण कधी? दिवाळीनिमित घरी जाणाऱ्यांच्या खिशाला कात्री

प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी जास्त वेळ रांगेत थांबावे लागू नये, यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर सहा, तर हडपसर स्थानकावर पाच अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. विविध स्थानकांवर एकूण १५ स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी १३ सुविधा सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी पुणे स्थानकावरील फलाट तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

प्रवाशांना मदत आणि माहिती मिळावी, यासाठी पुणे, मिरज, हडपसर, दौंड, अहिल्यानगर आणि खडकी स्थानकांवर मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. गर्दीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र वॉर रूमही कार्यान्वित करण्यात आली आहे. महिला प्रवासी आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना आसनव्यवस्थेत प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे २२० जवान तैनात करण्यात आले आहेत.

दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक सुविधांकडे लक्ष दिले जात आहे. प्रवाशांनी गाडीची माहिती आधी तपासून पुरेसा वेळ राखून स्थानकावर यावे. तसेच प्रवासादरम्यान स्थानकावरील सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
– हेमंतकुमार बेहरा, वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग

पुणे रेल्वेस्थानकाची सुरक्षा कडक; पाच लगेज स्कॅनर, प्रवाशांच्या तपासणीसाठी 19 मेटल डिटेक्टर

 १३ दिवसांतील प्रवाशांची आकडेवारी

तपशील.                                           प्रवासी संख्या
पुण्यात दाखल झालेले प्रवासी.                ११,२३,८६४
पुण्यातून बाहेरगावी गेलेले प्रवासी.              ११,१४,४१०
एकूण ये-जा करणारे प्रवासी.                     २२,३८,२७४
दररोजची सरासरी ये-जा.                             १,७२,१७६
स्थानकावरील एकूण प्रवासी संख्या.            २२,३९,९६५

गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजना

५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन
११ अतिरिक्त तिकीट खिडक्या
१५ स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे
५७ तिकीट तपासणी कर्मचारी
सुरक्षेसाठी २२० रेल्वे सुरक्षा दलाचे जवान

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळी आणि छठपूजेनंतर पुणे रेल्वे स्थानकावर किती प्रवाशांची ये-जा झाली?

    Ans: १ ते १३ नोव्हेंबर या १३ दिवसांच्या कालावधीत पुणे रेल्वे स्थानकावरून २२ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली आहे.

  • Que: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने किती विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे?

    Ans: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५५९ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे.

Web Title: Pune railway station 22 lakh passengers in diwali 2026 559 special train for festival tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • pune news
  • Pune Railway Station News

संबंधित बातम्या

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत
1

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
2

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

Congress PC on Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या तळेगाव दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड
3

Congress PC on Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या तळेगाव दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची दिवसभर धरपकड

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
4

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.