Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: कारसाठी २ लाख, फ्लॅटसाठी ३ लाख, तणावात गर्भपात आणि…; मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

पुण्यातील चंदननगर येथे २५ वर्षीय तेजस्विनी सोनवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कार, फ्लॅटसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीच्या मागणीवरून पती व सासरच्यांकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप.
  • मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तेजस्विनीने आत्महत्या केली.
  • पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि सोन्याच्या अंगठीची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Beed Crime: हुंडाबळीचा आणखी एक बळी! ‘पैसे घेऊन ये’ म्हणत सतत छळ; 20 वर्षीय पूजाने उचललं टोकाचं पाऊल

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करण्याऱ्या विवाहितेची नाव तेजस्विनी गोरख सोनवणे असे आहे. तिचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख संभाजी सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नांनंतर सुरुवातीला सगळं सुरळीत होत. मात्र काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करायला सुरुवात केली. गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका असे म्हंटले. नंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली. त्यांनतर २८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली.

मुलगा असेल तरच पाठवा…

मुलगी झाल्याने सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून दवाखान्याचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले आणि हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा असा अमानुष पवित्रा घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला.

फ्लॅटसाठी ३ लाख आणि ‘अधिक मासात’
एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्याने तेजस्विनीकडे ३ लाख रुपयानासाठी तगादा लावला. त्यावेळी तिने नकार दिला तर तिला मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर मे महिन्यात ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाही तर येणार नाही असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले. पण तिथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली.

छळाला कंटाळू आत्महत्या

२ जून ला रात्री १० वाजताच्या सुमारास गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन केले आणि सांगितले की तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही. त्यांनतर काही वेळातच तेजस्विनीचे मामा दत्तात्रय बापूराव दाते यांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

गुन्हा दाखल

या प्रकरणी तेजस्विनीच्या वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गोरख संभाजी सोनवणे(वय ३२ वर्षे – पती), संभाजी लक्ष्मण सोनवणे(वय ६२ वर्षे – सासरा), अलका संभाजी सोनवणे(वय ५५ वर्षे – सासू) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Mira Bhayandar मध्ये मोठी दहशतवादविरोधी कारवाई; फरार आरोपी हुजैफा दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे आहे.

  • Que: सासरच्यांकडून कोणत्या मागण्या केल्या जात होत्या?

    Ans: कार खरेदीसाठी पैसे, फ्लॅटसाठी ३ लाख रुपये आणि सोन्याच्या अंगठीची मागणी केली जात होती.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Pune crime 2 lakhs for a car 3 lakhs for a flat forced abortion amidst stress fed up with mental harassment 25 year old married woman ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ
1

Nagpur Crime: लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं
2

Alibaug Crime: 36 तासांत चोरीचा उलगडा! रेवदंडा पोलिसांनी ओडिशातील आरोपीला दुचाकीसह पकडलं

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट
3

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?
4

Pune Crime : रुग्णालयाच्या बिलावरून वाद; सामाजिक कार्यकर्त्याला डॉक्टरकडून पिस्तूलाचा धाक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.