Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संशयातून रक्तरंजित शेवट! पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू; बिबवेवाडी हादरलं!

पुण्यातील बिबवेवाडी येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या 23 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 10:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये सतत वाद
  • रागाच्या भरात पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला
  • उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; आरोपी पती अटकेत
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शास्त्राने भीषण हल्ला केल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सारिका शुभम घोडके असे या २३ वर्षीय मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Akola Crime: नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोस्टमॉर्टेमने उघड केला थरारक कट; एका चुकीने वहिनी आणि पुतण्या अडकले जाळ्यात

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव शुभम श्रीकांत घोडके असे आहे. तो एक पानटपरी चालक म्हणून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले आहेत. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास शुभम घरी आला तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने धारधार शस्त्राने सपासप वार केले.

या हल्ल्यात सारिका गंभीर जखमी झाली. सारिकाच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर खोलवर जखमा झाल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सारिकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या जखमा अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि गुरुवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली.

गुन्हा दाखल

सारिकाच्या आईने, गेणीबाई चव्हाण यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली असून, आपल्या मुलीच्या मृत्यूला तिचा पतीच जबाबदार असल्याचे स्पष्ट करत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि आरोपी शुभमला अटक केली. सुरुवातीला हा गुन्हा खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) या स्वरूपाचा दाखल करण्यात आला होता, मात्र उपचार सुरू असताना सारिकाचा मृत्यू झाल्याने आता पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाचे (कलम ३०२) कलम वाढवले आहे.पोलीस आता या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहे.

Pune Crime: 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह नवजात बाळाचा मृत्यू, मोबाईल डेटा डिलीट; संशय वाढला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune crime a bloody end fueled by suspicion wife dies in attack by husband bibwewadi left shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.