Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: भोर तालुक्यात रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात किकवी-केंजळ रस्त्यालगत 40 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृत्यू संशयास्पद असून ओळख पटलेली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 01:06 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला
  • मृत्यूचे कारण अस्पष्ट; ओळख अद्याप पटलेली नाही
  • पोलिसांकडून तपास सुरू, बेपत्ता तक्रारींची पडताळणी
पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याचा तपास सुरु केला आहे.

काय घडलं नेमकं?

रविवारी सकाळच्या सुमारास किकवी-केंजळ रस्त्यावरून गावातील काही नागरिक नेहमीच्या कामासाठी जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती हालचाल न करता पडलेली दिसली. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ राजगड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

शाळकरी मुलीशी अश्लील चाळे; रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्यक्तीची ओळख पटली नाही

मृत व्यक्ती वय अंदाजे ४० वर्षे असून, त्याच्या अंगावर निळ्या रंगाचे जर्किन, निळी जीन्स आणि पांढरा टी-शर्ट असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, राजगड पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची शहानिशा करत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तांत्रिक तपास करत आहेत.

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासमधील ऑफिस बॉयला अटक केली आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही ऑफिस बॉयने काढले असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये घडली.

काय घडलं नेमकं?

आरोपीचं नाव विकास गायकवाड (३५ वर्ष) असे आहे. आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो याच कोचिंग क्लासमध्ये रोज जायचा. याच दरम्यान ऑफिस बॉयने या आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला स्टोअर रूममध्ये घेऊन गेला. त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे ऑफिस बॉयने फोटो देखील काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आठवीतला मुलगा घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. त्याने क्लासला जायला नकार दिला. यामुळे वडिलांनी सगळी शहानिशा केली आणि क्लासमध्ये येऊन विचारपूस केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: भोर तालुक्यातील किकवी-केंजळ रस्त्याच्या कडेला.

  • Que: मृत व्यक्तीची ओळख पटली का?

    Ans: नाही, अद्याप ओळख पटलेली नाही.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime body of unidentified person found along roadside in bhor taluka natural death or foul play police investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…
1

Pune Crime: कुख्यात निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक, पोलीस कोठडीत सचिनची मोठी कबुली, म्हणाला…

Pune Crime: ITI च्या टेरेसवर रक्तरंजित थरार! वर्ग मित्राने 23 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने केले सपासप वार; तरुणाचा मृत्यू
2

Pune Crime: ITI च्या टेरेसवर रक्तरंजित थरार! वर्ग मित्राने 23 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने केले सपासप वार; तरुणाचा मृत्यू

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
3

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त
4

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.