कशी केली अटक?
रविवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ‘चार्ली पथक’ भांबरी चौक ते साई नाका रिंगरोड दरम्यान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एचपी पेट्रोल पंपासमोर झाडाखाली १८ ते २० वयोगटातील पाच तरुण संशयास्पद रितीने बसलेले आढळले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तेव्हा पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्यांना बेडत्या ठोकल्या. चार्ली पथकाने तातडीने या पाचही तरुणांचे फोटो पुणे पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवले. अवघ्या काही वेळातच धक्कादायक माहिती समोर आली. हे पाचही तरुण २४ जानेवारी रोजी पुणे शहर हद्दीतील खराडी भागात एका तरुणाचा निघृण खून करून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर पुणे येथील वाघोली पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१) (खून) आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींचे नाव काय?
लातूर एमआयडीसी पोलिसांच्या चार्ली पथकाने कैलास विठ्ठल राठोड, गणेश चंद्रकांत कट्टे, सुशील सुभाष कदम (तिघेही रा. खराडी, पुणे), करण विठ्ठल तुरे (रा. चंदन नगर, पुणे) आणि रोहित विकास गायकवाड (रा. नानापेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोणी केली ही कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. समाधान चवरे, अंमलदार तुळशीदास घडे, विजय जाधव, भीमराव बेल्लाळे, सचिन कांबळे, राजाभाऊ मस्के, अक्षय डिगोळे, सिद्धेश्वर टोंपे यांच्या पथकाने केली.
लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या
लातूर येथून एक धक्कदायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीला कामावरून येण्यासाठी उशीर झाल्याने संतापून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात घडली आहे. पोलीस या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव
Ans: लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात गस्तीदरम्यान.
Ans: बीएनएस कलम 103(1) खून व शस्त्र अधिनियमान्वये.
Ans: पुढील तपासासाठी आरोपी पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.






