तब्बल २९ वेळा वार
भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकरप्रसाद यादव ऊर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी शंकरावर अत्यंत क्रूरपणे तब्बल 29 वेळा धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की, शंकर रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी शंकरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरावर खोलवर झालेल्या जखमा आणि झालेल्या अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नेपोलिस तपास सुरु
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरु आहे. पोलीस घटना स्थळाचे फुटेज तपासत असून पुढील तपास सुरू आहे,
मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…
मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी एका प्रवाशाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी १२ तासात आरोपीचा शोध लावला असून त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव ओंकार एकनाथ शिंदे (वय २७) असे आहे. तर यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आलोक सिंह (वय ३१) असे आहे.
मेटलच्या कारखान्यात कामाला
आरोपी ओंकार शिंदे हा मालाडच्या कुरार व्हिलेज येथील रहिवासी आहे. तो दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरात असणाऱ्या एका मेटलच्या कारखान्यात कामाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस तपास करत आहे.
Ans: अवघ्या 24 तासांच्या आत दोन हत्या घडल्या.
Ans: धारदार शस्त्राने तब्बल 29 वेळा वार करून हत्या करण्यात आली.
Ans: सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.






