Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी

Pune Solapur Highway: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2026 | 02:14 PM
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू, एक जखमी

Follow Us
Follow Us:
  • इंदापूर येथील राजवडीत काळाचा घाला!
  • महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला
  • एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी!
इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे बांधकाम सुरू असताना माती आणि डबराचा मोठा ढिगारा अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका २५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३० वर्षीय मजूर जखमी झाला आहे. शुक्रवारी ( ३० ऑक्टोबर 2026) सकाळी सुमारे दहा ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास राजवडी उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मजुराचा मृत्यू

महामार्गालगत संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक माती आणि डबराचा मोठा ढिगारा कोसळला. त्यावेळी घटनास्थळी सहा कामगार उपस्थित होते. त्यापैकी तिघे चहा पिण्यासाठी गेले होते, तर उर्वरित कामगार बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत दोन मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. क्षणात घटनास्थळी एकच धावपळ उडाली. सहकारी कामगार आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर एका मजुराला ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आले.
प्रशासनाच्या माध्यमातून देखील बचाव कार्य सुरू होते. जखमी अवस्थेतील या मजुराला पुढील उपचारासाठी इंदापूर येथे पाठविण्यात आले. मात्र, दुसऱ्या मजुराला वाचविण्यात यश आले नाही.

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना

या दुर्घटनेत मशरूबल शेख (वय २५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नरीम रियाज उद्दीन अख्तर (वय ३०) हे जखमी झाले आहेत. हे दोघेही पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे महामार्ग परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असताना मातीचा एवढा मोठा ढिगारा अचानक कोसळण्यामागील नेमके कारण काय? कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जात होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या संपूर्ण दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि महामार्गावरील सर्व बांधकामस्थळांवर कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विकासकामांच्या वेगापेक्षा कामगारांचे जीव अधिक महत्त्वाचे असल्याची जाणीव या दुर्घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

💡

Frequently Asked Questions

  • Que: इंदापूरमध्ये दुर्घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे पुणे-सोलापूर महामार्गावर ही दुर्घटना घडली.

  • Que: राजवडी येथील दुर्घटनेत किती जण बाधित झाले?

    Ans: महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला, तर एक मजूर जखमी झाला.

  • Que: दुर्घटनेनंतर कोणत्या मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली?

    Ans: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची पाहणी केली.

Web Title: Indapur rajwadi pune solapur highway soil collapse labourer death one injured sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Accident
  • highway
  • Pune
  • Solapur

संबंधित बातम्या

Bhandara News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू! परसवाडा नाल्याजवळील घटना; अल्पवयीन मुलगा गंभीर
1

Bhandara News: ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू! परसवाडा नाल्याजवळील घटना; अल्पवयीन मुलगा गंभीर

Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम
2

Accident News Pune: डंपरच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी अंत! तळेगाव एमआयडीसीत ग्रामस्थांचा चक्का जाम

Jalgaon Accident News: संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने साधला घाला; पाळधी-तरसोद बायपासवर तरुणाचा करुणास्पद अंत
3

Jalgaon Accident News: संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच नियतीने साधला घाला; पाळधी-तरसोद बायपासवर तरुणाचा करुणास्पद अंत

Mumbai Pune Missing Link वरून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम, ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी
4

Mumbai Pune Missing Link वरून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम, ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.