काय नेमकं प्रकरण?
मृतक वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कुटीवरुन शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळावर जेव्हा पोहोचेल तेव्हा आरोपी प्रकाश हा आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्याशेजारी बसून रडत होते. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास काही केला नाही. मात्र वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि धक्कादायक माहिती समोर आली.
सुरुवातीला वाटले अपघात मात्र…
आरोपी प्रकाश गावंडे हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीचा छळ करत होता. याआधीही त्याच्यावर 498 कलमाअंतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता. तडजोड करून वृषाली पुन्हा नांदायला गेली होती. आरोपी प्रकाश गावडे याने पत्नी वृषालीला यापूर्वी तीनवेळा जेवणातून विष देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल तक्रार वृशालीच्या भावाने पोलिसात दिली होती. मात्र, प्रकाश गावंडे याच्यावर ठोस कारवाई झाली नव्हती. यांनतर प्रकाश गावंडे याने थंड डोक्याने पुन्हा एक योजना आखली. त्याने आपला मित्र मंगेश चहुळकर याला पत्नीला मारण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली.
माहेरच्यांनी संशय व्यक्त केला आणि…
कटानुसार २ मार्चला वृषाली स्कुटीवरून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचेल तेव्हा प्रकाश हा वृशालीच्या मृतदेहाजवळ रडत बसला होता. म्हणून पोलिसांनी तपास केला नाही, मात्र माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अपघाताच्या दिवशीचे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे यांचा पती प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले.
कोल्ड ब्लडेड मर्डर
हि हत्या ठरवून केलेली ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ आहे. ज्याला अपघाताचा रंग देण्यात आला होता. पोलिसांनी मंगेश सूर्यवंशी, मंगेश चहुळकर आणि शिक्षिकेचा पती प्रकाश गावंडे यांना अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेले वाहन आणि सुपारीचे पैसे देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.
Ans: सुरुवातीला अपघात वाटणारा हा प्रकार नंतर सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचे उघड झाले.
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावाजवळ ही घटना घडली.
Ans: मृत शिक्षिकेचा पती प्रकाश गावंडे याने मित्रांच्या मदतीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले.






