Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune crime: जामखेड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 9 मार्च रोजी झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 09:08 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जामखेडमध्ये 9 मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकरवर जवळून गोळीबार करण्यात आला होता.
  • गंभीर जखमी मोहोळकरचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून निलेश घायवळ कनेक्शनची चौकशी सुरू आहे.
पुणे: अहिल्यानगर येथील जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. एकूण सहा गोळ्या त्याला लागल्या होत्या. त्यातून एक गोळी थेट त्याच्या तोंडातही लागल्याची माहिती आहे. त्याच्यावर उपचार पुण्यातील ससून रुग्णालयात सुरु होता. आता या प्रकरणी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन् नंतर वारंवार अत्याचार केले; घरात कोणी नसताना आला अन्…

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. गुंड मोहोळकर याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र चार गोळ्या शरीरातून बाहेर काढण्यात वैद्यकीय अडचणी येत असल्याची माहिती आहे. आता उपचार सुरु असतांना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

पुण्यातून एकाला अटक

सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करणाऱ्यापैकी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा पुण्याचा रहिवासी असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या (पूर्ण नाव माहित नाही) या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पैलवान मोहोळकर चर्चेत कसा आला?

सागर मोहोळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारली होती. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.

Mumbai Crime: वादातून संताप अन् टोकाचं पाऊल… पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपी सुरत मधून अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू कसा झाला?

    Ans: जामखेडमध्ये झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

  • Que: ही घटना कधी घडली?

    Ans: 9 मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे ही गोळीबाराची घटना घडली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध आणि तपास सुरू आहे.

Web Title: Pune crime major update in jamkhed firing case wrestler sagar moholkar dies during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
1

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
2

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…
3

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
4

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.