
crime (फोटो सौजन्य: social media)
निलेश घायवळ ने केलेल्या गोष्टीचा त्रास कुटुंबाला
सचिन घायवळ हा परराज्यात आपला वेश बदलून राहत होता. त्याची दाढी केस वाढले होते. पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्याला शोधून काढल आणि राजस्थान मधून अटक केली आहे. पोलीस कोठडीत त्याने मोठी कबुली दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर तू पोलिसांच्या हाती लागू नकोस, फरार हो सतत ठिकाण बदलत रहा, असा सल्ला निलेश घायवळ याने भाऊ सचिनला दिला होता. मात्र आता त्याने केलेल्या कृत्याचा त्रास सगळ्या कुटुंबातील सदस्याला होत आहे. अशी माहिती त्याने पोलीस कोठडीत दिली आहे. पोलीस कोठडीत सचिन घायवळ याची चौकशी केली जात आहे. निलेश घायवळ याने आपली मुले परदेशात शिक्षणाला पाठवून त्यांचं भविष्य सुखकर केल आहे. मात्र इकडे कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे असेही तो म्हणाला.
सचिन घायवळ वर कोणता गुन्हा दाखल
सचिन घायवळ वर ४४ लक्ष रुपये खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्याच्यावर संघटित गुन्हेगारी मकोका दाखल झाल्यावर तो फरार होता. जवळपास ९ महिने तो पुणे पोलिसांना मिळाला नाही. मात्र त्याला राजस्थान मधून अटक करण्यात आली आहे. आता पुणे पोलीस निलेश घायवळचा शोध घेण्यासाठी सचिन घायवळचा तपास करत आहे. त्याने दिलेल्या सल्ल्याने निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे दोघेही संपर्कात होते आता हे स्पष्ट झाल आहे. एकमेकांच्या पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. पुणे पोलीस निलेश घायवळ पर्यंत पोहोचतात का? हे पाहण महत्वाचं आहे. आता सध्या तरी महत्त्वाचा आरोपी निलेश घायवळचा भाऊ पोलिसांना मिळाला आहे. त्याने वेष बदलून ९ महिने राजस्थान मध्ये काढली. तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेवून त्याला अटक करण्यात आली आहे.
निलेश घायवळ विरोधात नोटीस
निलेश घायवळच्या विरोधात पुणे पोलिसांनी या आधी ब्लू कॉर्नर, रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. तो लंडन मध्ये असल्याची माहिती आहे. मात्र त्याचा वीसा संपल्यावर तो भारतात येईल अशी अपेक्ष आहे. आता पोलीस काय कारवाई करणार हे पहाव लागेल. घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केली आहे.
Ans: मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष साखरे होते.
Ans: ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोणवडी येथील आयटीआयमध्ये घडली.
Ans: घोडेगाव पोलिसांनी आरोपी अमेय कोकरे याला अटक करून तपास सुरू केला आहे.