
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुण्यातील बंडू आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. स्वतःच्या नातवाच्या हत्या प्रकरणात संपूर्ण आंदेकर टोळी आत आहे. मात्र आंदेकर टोळीने दमदाटी करून जे काही अनधिकृत बांधकाम केल होत त्यावर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. आंदेकर टोळीने नाना पेठेत वारकरी भवन बांधल होत. त्यावर आज पालिकेने तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. बंडू आंदेकरची टोळी ही दमदाटी करून हफ्ता वसूल करायचे. त्या भागात असणाऱ्या मच्छी मार्किट मधून माया जमा करत असायचा. मात्र आता आंदेकर टोळीचा पुरता बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे.
पालिकेने आणल्या जेसीबी तोडक कारवाई करणार
आंदेकरने आपल्या भागात वारकरी भवन बांधल होत. मात्र महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून. आज सकाळी महापालिकेची टीम गेली आणि वारकरी भवन परिसरात पोलीस बंदोबस्त लावून त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. महापालिकेने नोटीस दिली नाही अस आंदेकरच्या वकीलच म्हणणं होत. मात्र आज महापालिका सगळा फौजफाटा घेवून उतरली आहे. अनधिकृत वारकरी भवनवर तोडक कारवाई केली जाणार आहे.
आंदेकर टोळीच वैर कोणाशी?
आंदेकर टोळीच सध्या सोमा गायकवाड टोळीशी वैर पेटल आहे. या टोळीने वनराज आंदेकरची हत्या केली होती. त्या नंतर सोमा गायकवाडच्या टोळीतील भावाची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर टोळी युद्ध पेटल आहे. मात्र आंदेकर टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे या सारखे गंभीर गुन्हे या टोळीतील सदस्यांवर आहेत. आता महापालिकेने त्याने दादागिरी करून जे काही अनधिकृत उभ केल आहे. त्यावर तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज वारकरी भवनवर तोडक कारवाई करण्यात आली. मात्र आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई झाल्यावर पोलीस एक्शन मोडवर आहेत.
बंडू आंदेकर टोळीचा म्होरक्या
बंडू आंदेकर हा टोळीचा म्होरक्या आहे. तो लहान मुलांकडून कृत्य करून घेतो असा त्याच्यावर आरोप आहे. नातवाच्या खून प्रकरणात तो सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकर वारंवार सांगत होता. माझ्या मुलाची हत्या करून चूक केली आहे. त्याचा बदला म्हणून स्वतःच्या नातवाला गोळ्या घालण्यात आल्या. पोलिसांनी बँक अकाउंट सील करण्यापासून ते मोक्का कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
Ans: पुणे
Ans: बंडू
Ans: मोक्का