Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hadapsar Fire : हडपसरमधील आगीबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती; तरुणाला घेतले ताब्यात

हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी लागलेली आग लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2026 | 02:03 PM
हडपसरमधील आगीबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती; तरुणाला घेतले ताब्यात

हडपसरमधील आगीबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती; तरुणाला घेतले ताब्यात

Follow Us
Close
Follow Us:
  • हडपसरमधील आगीबाबत धक्कादायक माहिती
  • पोलिसांनी तरुणाला घेतले ताब्यात
  • हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
पुणे :  हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीत शनिवारी लागलेली आग लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. या भीषण आगीत तब्बल १९ झोपड्या तसेच तीन दुचाकी भस्मसात झाल्या होत्या. आग लागल्यानंतर मजूर आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली होती.

 

वाद विवाद झाल्यानंतर तरुणाने एकाची दुचाकी पेटवून दिली. त्या दुचाकीने पेट घेतल्याने झोपड्यांना आग लागली असल्याचे समोर आले आहे. समर्थ तुपे (वय २०, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावर राम मनोहर लोहिया उद्यान आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. वसाहतीतील एका झोपडीला शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली होती. झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधलेल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागल्यानंतर वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळ धाव घेऊन प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी परिसरातील रहिवाशांची चौकशी केली. तेव्हा वसाहतीला आग ही दुर्घटना नसून, वसाहतील तरुणाशी वाद झाल्याने लावली गेल्याचे समोर आले. त्याने त्याची दुचाकी पेटवून दिली. त्या दुचाकीने पेट घेतला. नंतर शेजारी असलेल्या झोपड्यांना आग लागली, अशी माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपी समर्थ तुपे याला ताब्यात घेतले.

तुपे याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचा वसाहतीतील एका तरुणाशी वाद झाला होता. वादातून त्याने दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर या दुचाकीची झळ शेजारी असलेल्या दोन दुचाकींना पोहोचली. आग भडकल्यानंतर त्याची झळ झोपड्यांना बसली. नंतर एकापाठोपाठ झोपड्यांनी पेट घेतला. ‘पोलिसांनी या प्रकरणी तुपेला ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता ३२६ अन्वये ( जाणीवपूर्वक आग लावून देणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Web Title: It has been revealed that a youth set fire to a laborers colony in hadapsar on saturday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक
1

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार
2

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार

Pune Crime: त्याने वापर करून सोडलं’…, मेसेजनंतर आयटी तरुणीची मुठा नदीत उडी मारून आत्महत्या
3

Pune Crime: त्याने वापर करून सोडलं’…, मेसेजनंतर आयटी तरुणीची मुठा नदीत उडी मारून आत्महत्या

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ
4

प्रपोजच्या बहाण्याने बोलावलं अन् रचला हत्येचा कट, बंगळूरुत प्रेयसीने प्रियकराला जिवंत जाळल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.