संग्रहित फोटो
अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. अनुराग चांदमारे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव होतं. तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि आजोबा बंडू वावळकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी घडलेल्या अपघात प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. बावधन पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.
पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात
राज्यात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्या काही दिवसाखाली पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ बुधवारी एक हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड कंटेनरचे नवले ब्रिजवर अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे सहा ते सात गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यापैकी दोन वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुमारे २० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झाला आहे.






