Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: “तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

पुण्यातील कोथरूडमध्ये प्रेमप्रकरणातून 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुलीने फोन करून बोलावल्याचा आरोप असून तिच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 01:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोथरूडमध्ये प्रेमप्रकरणातून 23 वर्षीय तरुणाची हत्या.
  • मुलीने फोन करून बोलावल्याचा आरोप; कुटुंबीयांची बेदम मारहाण.
  • पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह 10 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी नागेच्या आईला धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

घड्लेली घटना १४ मार्च २०२६ रोजी रात्री घडली. नागेशचे कोथरूड परिसरातील एका मुलीशी मैत्रीचे नाते होते. शनिवारी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास नागेशला एकाचा फोन आला आणि तो घराबाहेर पडला. रात्री ८:०३ वाजता आरोपींनी नागेशच्या आईला त्याच्याच मोबाईलवरून फोन केला. फोनवर आरोपीने शिवीगाळ करत म्हंटले की, तुझा मुलगा नागेश आमच्या ताब्यात आहे, आम्ही त्याला मारले आहे. “१० मिनिटात येथे येऊन त्याला घेऊन जा, नाहीतर त्याला खाली टाकून देऊ असे म्हंटले.”
Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! 1 हजार रुपये थकीत म्हणून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; वसतीगृह चालकावर गुन्हा

फोन ठेवताच नागेशची आई आणि नातेवाईकांनी तात्काळ कोथरूडमधील मेगासिटी येथे धाव घेतली. तिथे नागेश छतावर विवस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही महिला आणि पुरुष त्याला लाकडी दांडके, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते. कसे तसे नागेशला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने आधी रत्ना हॉस्पिटल आणि नंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूपूर्वी नागेशने आपल्या आईला सांगितले की, त्याला मुलीने फोन करून बोलावले होते आणि तिथे गेल्यावर तिच्या कुटुंबीयांनी त्याला बेदम मारहाण केली.

गुन्हा दाखल

नागेशच्या आईने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची आई, वडील, तसेच चुलत्या आणि इतर नातेवाईक यांच्यासह १० हुन अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांनी संगनमत करून नागेशची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

गॅस सिलिंडरच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश; बीडमध्ये तब्बल 73 हजारांच्या टाक्या पकडल्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव नागेश संजय जाधव (वय 23) आहे.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून वाद झाल्याने आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली.

Web Title: Pune crime your son is in our custody call to mother young man murdered in brutal beating over love affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.