Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग…; भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ओंकार कदमविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदीही करण्यात आली होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 18, 2025 | 03:06 PM
उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता 'टार्गेट'

उत्पन्न वाढीसाठी पुणे महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर; मिळकत कर विभागाच्या निरीक्षकांना आता 'टार्गेट'

Follow Us
Close
Follow Us:

Pune Municipal Corporation:  पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील  एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंग केल्या प्रकरणी भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम असे या भाजप नेत्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात संबंधित महिला अधिकारी कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ओंकार कदम सातत्याने त्यांच्या विभागात येत होता. अनेकदा त्याने महिला अधिकाऱ्याला शिवीगळही केली. त्यांच्या संमतीशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड केले. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ओंकार कदमविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदीही करण्यात आली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली. त्यांतर आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“केंद्रात मोदींची सत्ता तरी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची…, राज्य सरकार भाषा का लादत आहे?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, आणि विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा पुणे महापालिकेत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  तसेच याप्रकरणात यापूर्वीच कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुरेशा पोलिस बंदोबस्ताअभावी महापालिकेच्या  आवारात  प्रवेश करण्यास मनाई असतानाही ओंकार कदम तिथे सातत्याने का येत-जात होता.

महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्याविराेधात भाजपचे वरीष्ठ नेते कारवाई का करीत नाही ? असा प्रश्नही सातत्याने उपस्थित केला जात होता. ओंकार कदमविरोधात महापालिकेच्या सुरक्षा विभागानेही पोलिसांकडे तक्रार केली होती. तसेच सदर महीलेने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. आयोगाकडे तक्रार करण्यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. पण पक्षाकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही.

US-Pakistan Relations: अखेर ट्रम्प यांचे पाकिस्तानवरील प्रेम आले उफाळून; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार

दरम्यान, भाजपच्या एका आघाडीचा शहराध्यक्ष दहा ते पंधरा कार्यकर्त्यंसोबत महापालिका भवनात येतो. अनेकवेळा महापालिकेच्या प्रवेशद्वारापासूनच हे लोक घोषणाबाजी करत आणि गोंधळ घालत महापालिकेत प्रवेश करतात. हा पदाधिकारी जमाव घेऊन महापालिकेतील विविध विभागात जातो. त्याठिकाणी माहिती मागतो आणि आताच्या आताच माहिती पाहिजे म्हणून कार्यालयात किंवा दरवाजात ठिय्या मारून घोषणाबाजी करतो, यामुळे आतील व्यक्तीला बाहेर येता येत नाही आणि बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाता येत नाही. दुसरीकडे त्याचे कार्यकर्ते प्रत्येक गोष्टीचे चित्रीकरण करत राहतात. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले होते. यासंदर्भात महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पोलिस संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई कऱण्याची अशी मागणी या पत्राद्वारे  केली होती.

महिला अधिकाऱ्याने जानेवारी महिन्यात या पदाधिकाऱ्याविरोधात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या  महिला तक्रार निवारण समितीकडे आणि महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. महिला अधिकाऱ्याच्या या तक्रारीनंतर अखेर आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pune municipal corporation female officer molested case registered against bjp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • BJp leader
  • crime news
  • pune crime news

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
2

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
3

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.