फोटो सौजन्य AI
मध्य – पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठयावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे . सौदी अरेबियातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यानंतर Brent क्रूडच्या दर सुमारे १०७.७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला . या महिन्यात तेलाच्या किमतीत जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली आहे . भारत आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलासाठी आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दरांचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर होतो .
AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद
तेलाच्या वाढत्या किमतींसोबत अमेरिकन डॉलरही मजबूत होत आहे . अमेरिकेच्या १० वर्षाच्या ट्रेझरी बॉंडचा परतावा ५ टक्क्यांपेक्षा वर गेल्याने गुंतवणूकदारांचा कल डॉलरकडे वाढला आहे . त्याचवेळी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदर वाढीची शक्यता बाजारात बळावली आहे .
त्यामुळे नवीन मोठ्या बाजारांमधून भांडवल बाहेर जाण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो . याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असून , मंगळवारी रुपया एका महिन्याहून अधिक काळातील नीचांकी पातळीवर पोहोचला .
रुपयातील घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करत असल्याचे संकेत बाजारातून मिळत आहेत . सरकारी बँकांच्या माध्यमातून डॉलरची विक्री करण्यात आल्याने रुपयाची घसरण काही प्रमाणात मर्यादित राहिली . मात्र तेलाचे दर दीर्घकाळ शंभर डॉलरच्या वर राहिल्यास भारताच्या आयात बिलावर आणि महागाईवर दबाव वाढू शकतो . त्यामुळे आगामी काळात RBI ची भूमिका , तेलाच्या किमती आणि अमेरिकन फेडच्या निर्णय हे तीन घटक रुप्याच्या दिशेसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत .






