crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. स्नेहा विशाल झगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे.
Latur News: लातूर हादरलं! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने छातीत सुरा खुपसून संपवले जीवन
नेमकं काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. हे प्रकरण पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. विद्यापीठ पोलीस स्थानकात आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्नेहाच्या मृत्यूने आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासरच्या मंडळींविरोधात गंभीर गुन्हे नोंदवा अशी स्नेहाच्या नातेवाईकांकडून मागणी करण्यात येत आहे.
यानंतर पोलिसांनी स्नेहाच्या पती विशाल झंडगे, सासरे संजय झंडगे, सासु विठाबाई झंडगे, दीर विनायक झंडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल; पुण्यातील धक्कादायक घटना
राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन विवाहीत महिला टोकाचं पाऊल उचलतांना दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील फुरसूंगीत पती व सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात तिने फॅनला ओढणीने गळफास लावून जीवन संपवले आहे.
सीमा अक्षय राखपसरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि खलसे (वय ५०) यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा व अक्षय यांचा काहीच महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर सीमा पती अक्षय व सासरच्या मंडळीसोबत फुरसूंगीतील राचंदवाडी येथे राहत होते. यादरम्यान, सीमाला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. तसेच, तिला टोचून बोलून व शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून ६ ऑगस्ट रोजी सीमा हिने राहत्या घरात फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना