Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता खात्यात जमा करून देण्यासाठी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ११ व १२ डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 01, 2026 | 05:50 PM
ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी
  • समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात
  • नववर्ष गजाआड आणि चौकशीच्या फेऱ्यात साजरे
धाराशिव : ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडित लाभार्थ्याला शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी येथील समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. याबाबत ४७ वर्षीय एका तक्रारदाराने धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाली असून आरोपीचे नववर्ष गजाआड आणि चौकशीच्या फेऱ्यात साजरे होणार आहे.

तक्रारीनुसार, ४ डिसेंबर रोजी समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये, तर कनिष्ठ लिपिक रमेश मालू वाघमारे (३७ वर्षे, रा. कुनकी, ता. जळकोट, जि. लातूर) याने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने ४, ७ व ११ डिसेंबर रोजी एसीबीने याची पडताळणी केली. या दरम्यान कपिल थोरात यांनी पंचांसमक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाले नाही. मात्र, कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा दुसरा हप्ता खात्यात जमा करून देण्यासाठी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

Cyber Fraud News: परिवहन विभागाचे ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; फक्त अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करा

त्यानंतर ११ व १२ डिसेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र आरोपीला संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून पैसे स्वीकारण्यास नकार देत भेट घेणे टाळले. अखेर ३१ डिसेंबर रोजी रमेश वाघमारे यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या अंगझडतीत होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर (अंदाजे किंमत ४० हजार रुपये), वनप्लस कंपनीचा मोबाईल (अंदाजे किंमत १० हजार रुपये) व दोन पेन मिळून आले आहेत. मोबाईलची तपासणी करून आवश्यक असल्यास जप्तीची कार्यवाही केली जाणार असून आरोपीची घरझडती प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई येथील समाजकल्याण कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणात शासनातर्फे फिर्यादी म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब मनोहर नरवटे यांनी कामकाज पाहिले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्यासह विजय वगरे, पोलीस हवालदार आशिष पाटील, पोलीस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व शशिकांत हजारें यांचा समावेश होता. या संपूर्ण कारवाईस छत्रपती संभाजी नगर विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे यांचे मार्गदर्शन होते.

 

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना

Web Title: Dharashiv osmanabad breaking junior clerk social welfare office custody acb accepting bribe thousand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • police

संबंधित बातम्या

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
1

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Maharashtra Aviation : खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी
2

Maharashtra Aviation : खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना
3

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू
4

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! महामार्गावर शेकोटी करत उभ्या तिघांना इनोव्हा कारने चिरडले; तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.