Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Case: पुणे पोलिसांच्या ‘या’ कारवाईमुळे आरोपी गाडेच्या अडचणीत वाढ; आतापर्यंत नेमके काय-काय घडले?

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2025 | 10:10 PM
Swargate Case: पुणे पोलिसांच्या ‘या’ कारवाईमुळे आरोपी गाडेच्या अडचणीत वाढ; आतापर्यंत नेमके काय-काय घडले?
Follow Us
Follow Us:

पुणे,: स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) तीन नव्या कलमांची पोलिसांनी वाढ  केली आहे. पीडितेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि दोन वेळा जबरदस्तीने संभोग करणे या कारणांमुळे कलम ६४(२), ११५(२) आणि १२७ (२) अंतर्गत आरोपीवर अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आरोपीचे वीर्य, रक्त, नख आणि केस याचे नमुने संकलित करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

आरोपी आणि तक्रारदार तरुणीची डीएनए चाचणीसाठी करण्यासाठी सॅम्पल घेतले आहेत. तसेच, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असली तरी तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी नेऊन संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला आहे. तसेच, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला त्याच्या मूळ गावी गुनाट (ता. शिरूर) येथे देखील नेले होते. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयाने यापूर्वी १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी (१३ मार्च) त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

अद्यापही मोबाईल मिळेना

ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दत्तात्रय गाडे जवळ जो मोबाईल होता तो मोबाईल अद्यापही पोलिसांना सापडला नाही. त्या मोबाईलचा शोध सध्या सुरू आहे. आतापर्यंत तपासात काय झाले ? – घटनास्थळाचा पंचनामा – पिडीत तरूणीचा न्यायालयासमोर जबाब – प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी – आरोपी फिर्यादीची कपडे जप्त – सायनटेफिक अ‍ॅनालिसीससाठी कपडे पाठवले – आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले – गुन्ह्यात बीएनएसचे 64 (2) एम, 115 (2), 127 (2) – विरूध्द 7 गुन्ह्यांची माहिती मिळवली पीडित तरुणीवर अत्याचार झाले तिच्याबद्दल चुकीची माहिती वकिलानेच प्रसारमाध्यमांना दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

एवढंच नाहीतर, जेव्हा या वकिलाला विचारलं चुकीची माहिती का दिली, तर त्याने पळ काढला. पहिल्या सुनावणीवेळी, आरोपीचा वकील ॲड सुमित पोटे यांनी माध्यमांशी बोलताना ‘आरोपीने पीडित तरुणीला साडेसात हजार रूपये दिले होते’ अशी माहिती दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं नंतर उघड झालं होतं. माध्यमांना खोटी माहिती देऊन पीडित महिलेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा या वकिलाचा प्रयत्न होता.

Web Title: Pune police added three more ipc section on swargate assissination accused dattatray gade knwo the case details crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Police
  • Swargate Case

संबंधित बातम्या

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
1

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
2

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
3

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.