Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: शाळा सुरक्षित आहेत की नाही? मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; शिपायाला अटक

एका शाळेमध्ये मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइल ठेवून रेकॉर्डिंग केल्याची घटना घडली आहे. मात्र हे घृणास्पद कृत्य शाळेतील शिपायानेच केले असल्याचे उघड झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 08, 2025 | 06:57 PM
शाळा सुरक्षित आहेत की नाही? मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; शिपायाला अटक

शाळा सुरक्षित आहेत की नाही? मुलींचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग; शिपायाला अटक

Follow Us
Follow Us:

पुणे: पुण्यातील पाषाण भागातील एका नामांकित शाळेच्या चेंजिग रूममध्ये मोबाईल ठेवून कपडे बदलतानाचे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिपायाने हा प्रकार केला असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने शहरात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिपाई तुषार सरोदे (वय २९) याला अटक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत पोक्सो सह बी.एन.एस  कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, पाषाण परिसरात ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. तुषार त्याठिकाणी शिपाई आहे. ६ जानेवारी रोजी खेळाचा तास संपल्यानंतर विद्यार्थिनी किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे उभा होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले, तो गेला परंतु, त्याने मोबाईल तिथेच ठेवून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. मोबाईल देखील त्याने एका स्विच बोर्डवर ठेवला होता.

परंतु, काही वेळातच विद्यार्थिनींच्या हा प्रकार लक्षात आला. तात्काळ त्यांनी मोबाईल ताब्यात घेऊन त्यातून व्हिडीओ डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितला. पालकांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती दिली. सरोदेला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला, मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदेकडे चौकशी केली. त्याने त्याने कबूली दिली. नंतर शाळेच्या व्याव्यस्थापान ने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदेला अटक केली.

पोलिस पाटलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सिंदेवाही तालुक्यातील देवाडा येथील पोलिस पाटलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.5) घडली. अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलासह पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली असून, यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मुकेश काशीनाथ पेटकुले (28 रा. देवाडा) असे आरोपी पोलिस पाटलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.5) अल्पवयीन मुलगी शाळेचा कार्यक्रम असल्याने गावातील तिची वर्गमैत्रीण मिळून सकाळी कार्यक्रमाला हजर झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास शाळेचा कार्यक्रम संपन्न झाल्याने दोघेही सिंदेवाही येथून बसने देवाडाकरिता निघाले. देवाडा गावच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर काही वेळात मुलींना गावातील पोलिस पाटील मुकेश पेटकुले याने आपल्या दुचाकीने आल्याचे दिसले. बस स्थानकापासून गाव काही अंतरावर असल्याने मुलींनी पोलिस पाटील पेटकुले याच्यावर विश्वास ठेऊन गावात सोडून द्यावे, अशी विनंती केली.

हेही वाचा: पोलिस पाटलाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ‘ती’ विनंती ठरली कारणीभूत

पेटकुले याने होय सोडून देतो म्हणून दोन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवले. फिर्यादी मुलीला सिंदेवाहीला घेऊन जातो आणि तिच्या वर्गमैत्रीणींना बसस्थानकावर ठेवतो, असे बोलू लागल्याने फिर्यादी मुलीने येण्यास नकार दिला. तरीसुद्धा आरोपी पेटकुले आग्रह करत होता. काही अंतरावर दोन्ही मुलींनी पेटकुले याला दुचाकी थांबविण्यास सांगितले आणि दोन्ही मुली दुचाकीवरुन उतरून पायी-पायी गावाच्या दिशेने निघाल्या.

Web Title: Pune police arrested school peon because he is video recording to girls while changing clothes crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • Pashan
  • Pune

संबंधित बातम्या

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 
1

बालाजी चौक परिसरातील मैलापाण्याच्या दुर्गंधीवरुन मनसे आक्रमक; महापालिका प्रशासनाला दिला इशारा 

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा
2

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!
3

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री
4

Kolte – Patil Developers Record : कोलते-पाटीलच्या इतिहासातील सर्वात दमदार परफॉर्मन्स; 600 कोटींच्या फ्लॅट्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.