डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील देवाडा येथील पोलिस पाटलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.5) घडली. अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलासह पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली असून, यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मुकेश काशीनाथ पेटकुले (28 रा. देवाडा) असे आरोपी पोलिस पाटलाचे नाव आहे.
हेदेखील वाचा : पैशांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; अमरावतीत विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.5) अल्पवयीन मुलगी शाळेचा कार्यक्रम असल्याने गावातील तिची वर्गमैत्रीण मिळून सकाळी कार्यक्रमाला हजर झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास शाळेचा कार्यक्रम संपन्न झाल्याने दोघेही सिंदेवाही येथून बसने देवाडाकरिता निघाले. देवाडा गावच्या बसस्थानकावर उतरल्यानंतर काही वेळात मुलींना गावातील पोलिस पाटील मुकेश पेटकुले याने आपल्या दुचाकीने आल्याचे दिसले. बस स्थानकापासून गाव काही अंतरावर असल्याने मुलींनी पोलिस पाटील पेटकुले याच्यावर विश्वास ठेऊन गावात सोडून द्यावे, अशी विनंती केली.
पेटकुले याने होय सोडून देतो म्हणून दोन्ही मुलींना आपल्या दुचाकीवर बसवले. फिर्यादी मुलीला सिंदेवाहीला घेऊन जातो आणि तिच्या वर्गमैत्रीणींना बसस्थानकावर ठेवतो, असे बोलू लागल्याने फिर्यादी मुलीने येण्यास नकार दिला. तरीसुद्धा आरोपी पेटकुले आग्रह करत होता. काही अंतरावर दोन्ही मुलींनी पेटकुले याला दुचाकी थांबविण्यास सांगितले आणि दोन्ही मुली दुचाकीवरुन उतरून पायी-पायी गावाच्या दिशेने निघाल्या.
फिर्यादी मुलीने धावत्या दुचाकीवरून प्रतिकार केला अन्…
आरोपीने आपली दुचाकी पुन्हा मुलींजवळ आणून मुलींना दुचाकीवर बसविले आणि दुचाकी सिंदेवाहीच्या दिशेने फिरविली. त्यावर फिर्यादी मुलीने चालत्या दुचाकीवर प्रतिकार करुन आपल्या वडीलांना फोन करून देवाडाच्या बसस्थानकावर येण्यास सांगितले. त्यावर आरोपीने घरी फोन करू नको, असे बोलू लागला आणि मोबाइल आपल्याजवळ ठेवून घेतला आणि फिर्यादी मुलीची ओढनी ओळून केस पकडले व घरी कोणाला फोन नको करू. तुझ्या वडिलांचा माझ्यावर विश्वास आहे, ते तुझ्यावर विश्वास करणार नाही, असे म्हणून वर्गमैत्रिणीसमोर फिर्यादी मुलीसोबत बळजबरी करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करू लागला.
पीडितेची वडील घटनास्थळी
तितक्यात फिर्यादी मुलीचे वडील त्याठिकाणी आले आणि घडलेला सर्व प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला. यावरून अल्पवयीन मुलगी, तिचे वडील व वर्ग मैत्रीण मिळून सिंदेवाही पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिस पाटिल मुकेश पेटकुले याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
तक्रार दाखल होताच सिंदेवाही पोलिसांनी आरोपी मुकेश काशिनाथ पेटकुले याला अटक करुन आपल्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे आणि सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राधिका गायकवाड तपास करत आहेत.