Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पुणे पोलिसांना मोठे यश! ‘या’ गुन्ह्यातील चोरट्यांना पकडण्यात मिळाले यश

सर्व आरोपी नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवाशी आहेत. प्रशांत व ताजीम हे सराईत आहेत. नाशिकवरून आरोपी पुण्यात येऊन वेगळ्या भागातून दुचाकी चोरत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 04:50 PM
Crime News: पुणे पोलिसांना मोठे यश! ‘या’ गुन्ह्यातील चोरट्यांना पकडण्यात मिळाले यश
Follow Us
Follow Us:

पुणे: शहरात सोन साखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना वाघोली पोलिसांना सोन साखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले असून, ते दुचाकी चोरून त्या दुचाकीवर सोन साखळी चोरत असल्याचे समोर आले आहे. तर, यातील एक नाशिक पोलिसांना ३ गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी असल्याचेही समोर आले आहे.

प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१), ताजीम सल्ला उद्दीन अन्सारी (वय २०) तसेच संजोग संतोष भांगरे (वय १८) व मनोज उदय पाटील (वय ३१, रा. सर्व नाशिक शहर) यांना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल व त्यांच्या पथकाने केली आहे.

शहरात सोन साखळी चोरीचे गुन्हे सातत घडत असून, सरासरी तीन दिवसाला एक घटना घडत आहे. परंतु, त्यातील चोरटे मात्र पोलिसांना हाती लागत नसल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ महिला व पादचारी महिला चोरट्यांकडून टार्गेट केले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यादरम्यान, वाघोली पोलिसांकडे दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार साईनाथ रोकडे व दिपक कोकरे यांना बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानूसार, त्यांना पकडण्यात आले.

Pune Crime: शिक्षणाच्या पंढरीत सोनसाखळी चोरट्यांचा उच्छाद वाढला; पुणेकर त्रस्त, पोलिसांचे हात मात्र रिकामेच?

नाशिकवरून पुण्यात येऊन चोऱ्या

सर्व आरोपी नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवाशी आहेत. प्रशांत व ताजीम हे सराईत आहेत. नाशिकवरून आरोपी पुण्यात येऊन वेगळ्या भागातून दुचाकी चोरत होते. नंतर त्याच दुचाकीवरून ते चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ताजीम अन्सारी हा नाशिक पोलिसांना पाहिजे आरोपी आहे. त्याच्यावर गंगापूर, म्हसरूळ व सातपूरा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत.

प्रशांत यादव हा सराईत गुन्हेगार आहे. प्रशांतने कुणाल साबळेच्या मदतीने दौंडमधून एक दुचाकी चोरली. वाघोलीत त्याच दुचाकीवरून दोघांनी सोन साखळी हिसकावली. तर, दुसऱ्या घटनेत त्याने ताजीम अन्सारी याच्या साथीने कोरेगाव पार्क व विमाननगर परिसरात सोन साखळी हिसकावल्याचे समोर आले. चोरलेले सोने त्यांनी मित्र संजोग व मनोज यांच्याकडे दिले होते. त्यांनाही पोलिसांनी अटककरून त्यांच्याकडून चोरीचे सोने जप्त केले आहे.

Web Title: Pune police arrests gang involved in gold chain snatching theft nashik crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik News
  • Pune Police

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.