Pune Police encounters Shahrukh Hatti criminal from the gang of notorious gangster Tipu Pathan
पुणे – अक्षय फाटक : पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या गँगमधील सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांकडून एन्काऊंटर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावच्या जवळ हा एन्काऊंटर झाला आहे. शाहरुख शेख (वय 33, रा.हडपसर) असे एन्काऊंटर झालेल्या गुंडाचे नाव आहे. शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर रॉबरी आणि मारहाण, खुनाचा प्रयत्न असे तबल १५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दोन वेळा मोक्का कारवाई देखील करण्यात आलेली आहे. पहिल्या मोक्कामधून तो बाहेर आला होता.
शाहरुख शेख याने नंतर हडपसर येथील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्या गॅंगमध्ये सहभागी झाला होता. या टोळीच्या माध्यमातून या गॅंगने हडपसर, वानवडी आणि कोंढवा या भागात आपली दहशत निर्माण केली होती. दरम्यान दोनच महिन्यांपूर्वी टिपू पठाण व त्याच्या गॅंगवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली होती. तर टिपू पठाणचा एका कार्यक्रमात सहभागी होत त्याचे व्हिडिओ व्हायरल केले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान टिपू पठाणच्या गँगवर मोक्का कारवाई केल्यानंतर शाहरुख शेख हा पसार झाला होता. तेव्हा पासून गुन्हे शाखा आणि पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते. रविवारी मध्यरात्री तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पथक गेले होते. तेव्हा त्याच्याकडे पिस्तुल असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाकडून शाहरुख शेख याचा शोध सुरू होता. सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे आणि युनिट पाचचे कर्मचारी हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावच्या येथे गेले होते. शोध घेताना तो गावापासून बाहेर रस्त्यावर होता. तेव्हा मुख्य रस्त्यावरून 500 मीटर अंतर तो होता. पोलीस आल्याचे समजताच शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली. नंतर सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी त्याच्यावर स्वरक्षणाखातर गोळी झाडली. ज्यात शाहरुख याचा एन्काऊंटर झाला.