पोलिसांनी बनावट कीटकनाशकच्या रॅकेटचा पर्दाफाश; मुख्य आरोपीला अटक
पुणे : घरफोडीचे तब्बल ४० हून अधिक गुन्हे दाखल असलेला चोरटा राजेश राम पपूल उर्फ चोर राजा याच्यासह साथीदाराला हडपसर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे. तो चोर राजा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्याकडून ८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.
याप्रकरणी चोरटा राजेश राम पपूल उर्फ चोर राजा (वय ४०, रा. दुगड चाळ, कात्रज), साथीदार प्रदीप उर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय ३५, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), तसेच सराफ व्यावसायिक कुणाल रुपेश वाफगांवकर (वय २३, रा. सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, चंद्रकांत रेजीतवाड, सागर ननावरे यांनी केली.
राजेश चोर राजा या टोपन नावाने ओळखला जातो. त्याच्यावर घरफोडीचे ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार प्रदीप याच्यावर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजेश व प्रदीप यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने रांजणगाव, कात्रज, हडपसर परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते.
हडपसर पोलिसांनी सापळा लावून दुचाकीस्वार राजेश आणि साथीदार प्रदीप यांना पकडले. तपासात दोघांनी हडपसर भागात आठ ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची सराफ व्यावसायिक कुणाल वाफगावकर याला विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने वाफगावरकर याला अटक केली.
दुचाकीनंतर रिक्षाचा वापर करायचा
राजेश पपूल सराइत आहे. घरफोडीचे गुन्हे केल्यानंतर तो पसार होण्यासाठी दुचाकीनंतर रिक्षाचा वापर करायचा. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो त्याच्या वेशभूषेत बदल करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तब्बल ७०० किलो मिटर अंतरावरील वेगवेगळे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर राजेश याला पकडण्यात यश आले आहे.