Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीने नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2024 | 02:52 PM
पतीने नोकरीचे आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणलं अन् थेट कुंटणखान्यात…; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

पुणे : नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, क्रांती चौक, बुधवार पेठ, मुळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना मॅनेजर विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), किकास उजल मंडोल (वय २१), टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम शशिकांत हेगडे, रेश्मा सुरेंद्र तुपकर, सिमा अजय आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात आहे, अशी माहिती दिली. तसेच, इतरही गोष्टींबाबत त्यांना कळविले. उपायुक्त निखील पिंगळे यांनी गंभीर दखल घेत लागलीच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच, त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील केले.

त्यानुसार पथक हे बुधवार पेठेत गेले. अब्राहमने वाड्यातील एक घर दाखविले. दरवाजात कुंटणखाना चालिका सुमी बिश्वास बसली होती. पोलिसांनी तेथे छापा घालून तपासणी केली. त्यात पाच तरुणी आढळून आल्या. त्यांची सुटका करत चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : मैत्रिण दुसर्‍यासोबत फिरताना दिसली म्हणून तिचा जबडाच केला फ्रॅक्चर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सुटका केलेल्या मुलींची कहाणी..!

एका मुलीने तिच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिच्या मैत्रिणीकडून बुधवार पेठ येथे काम केल्यास जास्त पैसे मिळतील असे सांगितले. त्यामुळे ५ महिन्यापूर्वी ती पश्चिम बंगालमधून येथे आली. दुसर्‍या तरुणीच्या माहितीनुसार मुंबईत घरकाम करत असे, जादा पैशांच्या आमिषाने तिला येथे आणण्यात आले. तर एकीला जयपूरहून येथे आणले आहे. चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्या व्यवसायाला लावले. पश्चिम बंगालमधील १९ वर्षाच्या तरुणीबरोबर विशाल मंडोल याने लग्न केले. नंतर तो तिला गावाहून पुण्यात घेऊन आला व तिला वेश्या व्यवसायाला लावले. ग्राहकांकडून मिळणार्‍या ५०० रुपयांपैकी २५० रुपये सुमी बिश्वास व मॅनेजर विक्रम बिश्वास ठेवून घेत होते. पोलीस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pune police has rescued 5 young women in a big operation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?
1

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
2

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
3

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
4

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.