Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

एकाच प्रथेचे नियम गावागावानुसार का बदलतात? ओटीतील साहित्य, गारव्यातील पदार्थ किंवा परडीतील नैवेद्य यामध्ये स्थानिक परंपरेनुसार फरक दिसतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची रीत समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 27, 2026 | 10:06 PM
ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • ओटी भरणे आणि वाण देणे या प्रथा प्रामुख्याने शुभप्रसंगी सन्मान आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी केल्या जातात.
  • दुखवटा आणि गारवा देण्याच्या परंपरांमध्ये कुटुंबाला आधार देण्याची सामाजिक भावना विशेषत्वाने दिसून येते.
  • परडी सोडण्याची प्रथा जलस्रोतांशी जोडलेली असून स्थानिक श्रद्धेनुसार तिच्या पद्धतीत बदल आढळतात.
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये लग्न, सण, समारंभ तसेच सुख-दुःखाच्या प्रसंगी काही खास रीतिरिवाज आजही पाळले जातात. ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे आणि वाण देणे अशा काही प्रथांमागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून नाती जपणे, परंपरांचे जतन करणे, सन्मान व्यक्त करणे आणि प्रसंगानुसार कुटुंबाला आधार देणे हा असा भावही दिसतो. या प्रथांचे कोणते नियम तसे नसले तरी वेगेवेगळ्या आचरण पद्धती वेगवेगळ्या भागात रूढ आहेत.  मात्र या प्रथा गाव-खेडे, प्रदेश-भाग, जात-समुदाय आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलू शकतात.

ओटी भरणे

ही प्रामुख्याने सुवासिनीच्या सन्मानाशी जोडलेली प्रथा आहे. ओटीमध्ये तांदूळ, हळकुंड, नारळ, फळे, खण किंवा वस्त्र किंवा वस्त्राची पिसे आणि काही ठिकाणी दक्षिणाही दिली जाते. अधिक मासात विवाहित मुलीने आईची ओटी भरण्याची परंपरा बऱ्याच कुटुंबांत आढळते. शिवाय श्रावण महिन्यातील शुक्रवार स्त्रिया आपापल्या घरी हळदीकुंकवाचे आयोजन करून ओटी भरण्याचा कार्यक्रमही करतात. सहसा संपूर्ण महाराष्ट्रात ओटी भरण्याची परंपरा जागोजागी पाहायला मिळते. छोट्या हळदीकुंकवापासून ते मोठ्या लग्नसमारंभांपर्यंत ओटीची प्रथा अगदी आजही सर्रास चालते. बऱ्याच ठिकाणी सुवसिनीना वर दिल्याप्रमाणे नारळ,वस्त्र, तांदूळ किंवा गहू, केसांत माळायला गजरे अशी संपूर्ण ओटी दिली जाते. ज्यात मान्यतेनुसार नारळ हा अपत्यप्राप्तीसाठी शुभ मानला जातो. तर बऱ्याच ठिकाणी कुमारिका आणि विधवा स्त्रियांना वस्त्र किंवा वस्त्राचे पीस आणि तांदूळ किंवा गहू दिले जाण्याचीही परंपरा आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर भागात द्राक्षबागांचीही ओटी भरली जाते. पाच किंवा सात सुवासिनी एकत्र येऊन द्राक्षांच्या पाच झाडांना हळदी कुंकू लावतात. त्यातील एका झाडाला साडी नेसवली जाते. तयार झालेले द्राक्षांचे घड प्रत्येकीच्या ओट्यात ठेवली जातात. बऱ्याच महाराष्ट्राच्या भागात नदीचीही ओटी भरली जाते आणि नदीलाही साडी नेसवून, हळदी कुंकू लावून तिची ओटी भरण्याची प्रथा आहे.

आहेर करणे

एखाद्या शुभप्रसंगी नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू, रोख रक्कम किंवा उपयोगाची वस्तू देऊन सन्मान करणे याला आहेर करणे असे म्हणतात. लग्नसमारंभात वधू-वर, त्यांच्या आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना आहेर देण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रात आहेर करण्याच्या प्रथेत प्रामुख्याने साडी-ओटी स्त्रियांसाठी तर टोवेल टोपी आणि कपड्यांचे वस्त्र पुरुषांसाठी दिले जाते. पुरुषांना यात काही ठिकाणी शाल श्रीफळ म्हणजेच शाल आणि नारळ देण्याचीही प्रथा आहे. बऱ्याच ठिकाणी मान सन्मान म्हणून फेटा बांधण्याचीही प्रथा आहे. रोख रक्कम भेट म्हणून देताना सहसा बंद पाकीट किंवा लिफाफा देण्य्याचीही पद्धत बरीच रुजू आहे. आता जसजसे काळ बदलत आहे तसे आहेराचे स्वरूप भेटवस्तूने घेतले आहे. यात वस्तूची किंमत जास्त असण्यापेक्षा आपुलकी आणि नात्याचा मान महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात बोरवेल आणि विहिरी बांधल्यावरही त्यांना आहेराची साडी अर्पण केली जाते.

Vastu Shastra Married Daughter: माहेरून मुलीला वस्तू देताय? ‘या’ 5 गोष्टी देण्याआधी हे नक्की वाचा

दुखवटा देणे

आपल्या नातलगांच्या किंवा मित्र, शेजाऱ्यांच्या घरी शोकप्रसंगी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर देणे, शांतपणे श्रद्धांजली अर्पण करणे आणि शक्य असल्यास त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करणे, हा त्यामागचा मुख्य सामाजिक भाव आहे. मयत झालेल्या कुटुंबात दुख: ओढवल्याने आणि तशी प्रथाही काही ठिकाणी असल्याने काही दिवस त्या घरी स्वयंपाक बनवला जात नाही, शुभप्रसंग साजरा केला जात नाही. अशा वेळेत बऱ्याच ग्रामीण ठिकाणी अजूनही निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी नातलग किंवा मित्र परिवार जेवण, चहापाणी वगैरे घेऊन जातात्त. कोणी व्यक्ती मयत  झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय वर्षभराच्या कालावधीसाठी दिवाळी सारखे सणवार साजरे करत नाहीत;अशा वेळी नातलग,मित्रपरिवार त्यांना फराळाचे वगैरे पदार्थ देतात. याला ‘दिवाळी घेऊन जाणे’ असेही म्हंटले जाते. हा एका प्रकारचा दुखवटाचं आहे.  महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागात अजूनही अशी परंपरा आहे कि निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी शेजारी आणि नातलग १३ ते १५ दिवस रोज सकाळचे व रात्रीचे जेवण आपापल्या घरी बनवून घेऊन जातात. आणि त्या शोकाकुल कुटुंबियांना धीर-दिलासा देण्यासाठी त्यांच्याबरोबर बसून जेवण करतात. बऱ्याच ग्रामीण ठिकाणी ही वाखाणण्याजोगी प्रेमभावना दाखवणारी आणि सांत्वनाची अनोखी परंपरा पाहायला मिळते, जी शहरांच्या धकाधकीच्या जीवनात लोप पावत चाललेली पाहायला मिळत आहे. दुखवटा देण्याची प्रथा म्हणून सहसा टोवल टोपी व पूर्ण कपडे आणि साडी चोळीची ओटी असा एका प्रकारचा आहेरही काही ठिकाणी केला जातो.

गारवा आणणे

ग्रामीण महाराष्ट्रात प्रचलित असणारी ही प्रथा म्हणजे गारवा आणणे किंवा गारवा नेणे. अगदी शब्दातील अर्थाप्रमाणेच याचा मूळ अर्थ वातावरणात, शरीरात आणि मनात गारवा थंडावा निर्माण करणे असाच होतो. बऱ्याच ठिकाणी शुभ प्रसंगात गारवा नेण्याची प्रथा पाळली जाते. लग्न समारंभापूर्वी वधूपक्षाकडून वरपक्षाकडे आणि वरपक्षाकडून वधूपक्षाकडे गारवा देण्याची पद्धत आहे. लग्नाच्या गारव्यात बहुधा शरीराला थंडावा देणारे पदार्थ दिले जातात. जसे कि दहीभात, केळी, आंबील, मुगाचे पदार्थ ई. यात अजूनही भरपूर प्रकारचे पदार्थ असतात.

लग्नकार्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे घराच्या भूमीपूजनाला, बोर किंवा विहिरीच्या पाणीपूजनाला, चौकटपूजनाला आणि वास्तूशांतीलाही गारवा नेण्याची अगदी रूढ पद्धत आहे. या गारव्यात सहसा आंबील, फळे, पुरणाच्या पोळ्या, दहीभात ई. नेण्याची परंपरा आहे. अशी मान्यता आहे कि घराच्या बांधकामाच्या पूजनासाठीचा गारवा बहिणींनी किंवा आत्यानी आणायचा असतो. वास्तू बांधताना दहीभात वगैरे वास्तूच्या चारीबाजूंनी शिंपडला जातो; ज्यामुळे वास्तू शांत होते आणि कोणतीही अडचण येत नाही अशी मान्यता आहे.

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

परडी सोडणे

परडी सोडण्याची ही प्रथाही ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळते. ही परडी पाण्याच्या स्त्रोतांच्या ठिकाणी सोडली जातात. विहीर, ओढा, नदी, तलाव, शेततळे, बोरवेल या जलस्त्रोताना परडी सोडली जाते. गव्हाची, ज्वारीची ताटे किंवा चिपाडे (ज्यावर गहू ज्वारी लागतात ती वाळलेली रोपे) पंचकोनी किंवा सप्तकोनी सुतळीनी बांधली जातात. त्यावर पुरण पोळ्यांचा नैवेद्य, सात केळी, सात सुपारी, सात लवंग, सात हळकुंड, सात दिवे, सात गव्हाचे मुटके प्रसाद म्हणून ठेवली जातात. जलस्त्रोतांमध्ये सात आसरा म्हणजेच सात देवता असतात अशी मान्यता आहे. त्या आसरांना म्हणजेच देवतांना संतुष्ट करण्यासाठी किंवा त्या जलस्त्रोतामध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणूनही ही परडी सोडण्याची संकल्पना आहे. ही परडी नदी विहिरीला सोडली जाते. काही ठिकाणी त्या परडीवरील नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहणही केला जातो. जलस्त्रोताला नारळही फोडला जातो. काही ठिकाणी आजारपण, दुखणे घालवण्यासाठीही परडी उतरून सोडण्याची प्रथा आहे. काही मान्यतानुसार फक्त पुरूषाच ही परडी पानस्थळी सोडू शकतात.

वाण देणे

वाण देण्याची ही प्रथा विशेषतः हळदी-कुंकू, मकरसंक्रांत किंवा इतर धार्मिक प्रसंगी सुवासिनीं आणि नवविवाहीतांमध्ये प्रचलित आहे. फळे, धान्य, सौभाग्यवस्तू किंवा उपयोगाच्या वस्तू देऊन परस्पर शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. अधिक मासात ब्राम्हणाला ताट त्यात अनारसे, निरांजने, बत्ताशे वगैरे दिले जातात. मकरसंक्रांतीत विशेष करून जावयाला चांदी सोनेच्या वस्तू भेट दिल्या जातात. जावयाला संक्रांतीला चांदीच्या वाटीत तिळगुळ आणि सुनेला हलव्याचे दागिनेही दिले जातात. काही परंपरांमध्ये वाण देताना ते पदराच्या टोकाचा आधार घेऊन देण्याची पद्धत सांगितली जाते. दसऱ्याच्या वेळी आपट्याचे सोन्याचे पान जावयाला वाण म्हणून दिले जाण्याची परंपराही आहे.

या सर्व रीतिरिवाजांकडे पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे—प्रथा म्हणजे श्रद्धा आणि संस्कृतीचा भाग; त्या प्रत्येक घरात प्रत्येक भागात अगदी तशाच पद्धतीने पाळल्या जातील असे नाही. त्यामुळे कुटुंबाची परंपरा, स्थानिक रूढी आणि प्रसंगाचा संदर्भ समजून घेऊन विधी केला जातो

Web Title: Traditional maharashtra rituals oti aaher garva vaan customs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Hindu tradition
  • LIFESTYLE
  • maharashtra
  • Religion

संबंधित बातम्या

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
1

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ
2

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल
4

२६५ तालुक्यांत दुष्काळाची घोषणा; कर्ज, वीजबिलात सवलत मिळणार, पण मदत बांधापर्यंत पोहोचणार का? शेतकऱ्यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.