Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विवेक वेलणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 28, 2026 | 12:30 AM
ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा देऊनही पालन नाही; न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल होणार?

Follow Us
Follow Us:

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी व वायू प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निसर्ग सेवक संस्था व सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, यापूर्वी गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय हस्तक्षेपातून ते मागे घेतले जात असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचे धाडस केले जाते, असा आरोपही त्यांनी केला.

 

विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषण तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत शहरातून पोलिसांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असतील. तसेच पोलिस प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांनीही या उल्लंघनांच्या नोंदी घेतल्या असल्याचे वेलणकर यांनी पत्रात नमूद केले आहे. या सर्व नोंदींच्या आधारे संबंधित मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली. दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत महिनाभरात न्यायालयात खटले दाखल करणे आवश्यक आहे.

मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी जागेवर कारवाई करणे टाळले असेल, हे समजण्यासारखे आहे. मात्र, आता तातडीने कायदेशीर कारवाई न केल्यास दरवर्षी ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रकार कमी होण्याऐवजी वाढत जातील. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन वेलणकर यांनी पोलिस आयुक्तांना केले आहे.

मिरवणुकीत दणदणाट

विसर्जन मिरवणुकीत प्रचंड दणदणात झाला. त्यामुळे लोक हैराण झाले होते. ध्वनी प्रदुषणात कोणतीही कमतरता जाणवली नाही. मध्यवर्ती नारायण पेठेत सर्वाधिक ध्वनी प्रदूषण कळसाला पोहोचले होते. माझ्या आंदोलनाचे यश आले नाही, प्रामुख्याने काही मंडळांनी माझे आर्टिंफिशल इंटेलिजन्स व्हिडिओ बनवून, मी बोललेले दाखवून नाचवत होते. ३६५ दिवस शांतता हवी असून, त्यासाठी माझे कार्य सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ध्वनी प्रदुषणविरोधात लढणारे विद्यानंद बापट यांनी दिली आहे. पोलिसांनी  ऑन द स्पॉट कारवाई करायला पाहिजे होती. डेसीबलविरुद्ध  कारवाईची इच्छा होती तर का केली नाही. ती पुढे काही दिवसांत करावी, अशीही मागणी बापट यांनी केली.

हे सुद्धा वाचा : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

पिंपरी चिंचवडमध्ये ९१ मंडळांवर गुन्हे

गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ ते २६ सप्टेंबर 2026 या कालावधीत शहरात ध्वनीप्रदूषणासंदर्भात एकूण ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परिमंडळ १ मध्ये सर्वाधिक २९ गुन्हे दाखल झाले आहेत. परिमंडळ २ मध्ये ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ ३ मध्ये ८ गुन्हे दाखल आहेत. तर परिमंडळ ४ मध्ये १० गुन्हे दाखल झाले आहेत.  परिमंडळनिहाय कारवाईमध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, दापोडी, बावधन, काळेवाडी, हिंजवडी, वाकड, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि शिरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे.

Web Title: Demands are being made to register cases against ganesh mandals that violate court orders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • DJ Speaker
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका
1

‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर
2

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
3

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ
4

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.