
सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
चेन्नईसाठी आठवड्याला १२ गाड्या
दक्षिण भारतासाठी गाडी क्रमांक ०१०१५ आणि गाडा क्रमाक ०१०१६ सीएसएमटी-चेन्नई साप्ताहिक वातानुकूलित १२ फेऱ्या, सीएसएमटी-बेंगळुरू साप्ताहिक वातानुकूलित (०१०१३/०१०१४) १४ फेऱ्या, तर एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक (०१४६३/०१४६४) कोकण मार्गे १२ फेऱ्या करेल. एलटीटी-मडगाव साप्ताहिक (०११७९/०११८०) १४ फेऱ्या करणार आहे. उत्तर भारतासाठी एलटीटी-मऊ द्वि-साप्ताहिक (०११२३/०११२४) २४ फेऱ्या, एलटीटी-बनारस द्वि-साप्ताहिक (०१०५१/०१०५२) २४ फेऱ्या आणि हडपसर-गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक (०१४३१/०१४३२) २४ फेऱ्या धावतील.
आरक्षण आजपासून
महाराष्ट्रासाठी सीएसएमटी-लातूर द्वि-साप्ताहिक (०११०५/०११०६) २६ फेऱ्या, सीएसएमटी-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट (०२१३९/०२१४०) १२ फेऱ्या, सीएसएमटी-कोल्हापूर साप्ताहिक (०१४१७/०१४१८) १२ फेऱ्या, पुणे-नवीन अमरावती साप्ताहिक वातानुकूलित (०१४०३/०१४०४) १२ फेऱ्या, नागपूर-हडपसर द्वि-साप्ताहिक आणि साप्ताहिक मिळून ४० फेऱ्या, तर कोल्हापूर-कलबुर्गी (०१४५१/०१४५२) आठवड्यातून ५ दिवस ६४ फेऱ्या करेल. या गाड्यांचे आरक्षण २७ आणि २८ सप्टेंबरपासून पीआरएस केंद्र, संकेतस्थळ आणि रेलवन अॅपवर सुरू होईल.
मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी
मुंबईतून ६ विशेष एकमार्गी गाड्या
पहिली गाडी (०१११९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रविवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल, दुसरी नागपूर विशेष गाडी (०११०९) सोमवारी, २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूरला पोहोचेल, दोन्ही गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.
तिसरी गाडी अमरावतीसाठी (०११०७) रविवारी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता अमरावतीला पोहोचेल, तिला बडनेरापर्यंत थांबे असतील. चौथी गाडी कोल्हापूरसाठी (०११११) सोमवारी सकाळी ११.३० वाजता सीएसएमटीहून सुटून रात्री १०.४० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. तिला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज आणि हातकणंगले येथे थांबा असेल.
पाचवी आणि सहावी गाडी सोलापूरसाठी (०१११५ आणि ०१११७) लोकमान्य टिळक टर्मिनसहून रविवार आणि सोमवारी रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सोलापूरला पोहोचेल, तिला ठाणे, पनवेल, लोणावळा, पुणे, दीड आणि कुडूवाडी येथे थांबा आहे. सर्व गाड्यांमध्ये २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन असतील, आरक्षण पीआरएस केंद्र, संकेतस्थळ आणि ‘रेलवन’ अॅपवर उपलब्ध असेल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)