Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 44 लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 12, 2025 | 01:20 PM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 44 लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 44 लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

Follow Us
Follow Us:

पुणे : ड्रग्ज मुक्त सिटीचा संकल्प पुणे पोलिसांचा असला तरी तस्कर मात्र छुप्या पद्धतीने शहरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे दिसत असून, कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तो हे अमली पदार्थ विक्री करण्यास आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रीतम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.

शहरात एका २० वर्षीय तरुणाने पंधरा दिवसात पाच लाखांचे अमली पदार्थाचे सेवन केल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाल्यानंतर त्याला हे अमली पदार्थ पुण्यातूनच मिळाल्याचेही समोर आले होते. त्यामुळे पोलिसांकडून पुन्हा ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांकडे मोर्चा वळवला होता. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. तेव्हा अरुण अरोरा याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

अरोरा याच्याकडून दोन किलो १४० ग्रॅम चरस, एक किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ४३ लाख ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरोराने अमली पदार्थ कोणाकडून आणले तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खून, कारण काय तर…

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Pune police has seized drugs worth 44 lakhs and arrested one person nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
1

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण
2

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

Hingoli Earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! 3.5 रिश्टर तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Hingoli Earthquake : हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! 3.5 रिश्टर तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Breaking News Updates Today: ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते
4

Maharashtra Breaking News Updates Today: ऑपरेशन टायगरचे फोटो समोर, सहा खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटले होते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.