Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; महासंचालक कार्यालयाला पाठवणार प्रस्ताव

सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती तसेच एकाच पोलीस ठाण्यावर येणारा ताण लक्षात घेऊन नव्याने ५ सायबर पोलिस ठाणे निर्मितीसाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2025 | 12:49 PM
गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा 'ॲक्शन प्लॅन'; महासंचालक कार्यालयाला पाठवला प्रस्ताव

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा 'ॲक्शन प्लॅन'; महासंचालक कार्यालयाला पाठवला प्रस्ताव

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती तसेच एकाच पोलीस ठाण्यावर येणारा ताण लक्षात घेऊन नव्याने ५ सायबर पोलिस ठाणे निर्मितीसाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे पोलिसांकडून तसा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाला पाठविला जाणार असून, प्रत्येक झोनला एक सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. तर, मनुष्यबळाची मागणी देखील करण्यात येणार आहे.

पुणे शहरात सायबर गुन्ह्यांसाठी शिवाजीनगर येथे पोलिस ठाणे आहे. साधारण दररोज ६० ते ८० तक्रारी अर्ज दाखल होतात. परिणामी पोलिसांच्या कामकाजावर ताण पडतो. सायबर गुन्ह्यांचे कामकाज तांत्रिक विश्लेषणावर होते. यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास देखील वेळ लागतो. परंतु, त्यामानाने दर‌वर्षी या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने ५ सायबर पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचे नियोजीत आहे.

शिवाजीनर येथील सायबर पोलिस ठाणे केंद्रस्थानी राहणार असून, इतर पाच पोलिस ठाणी परिमंडळानिहाय तयार केली जाणार आहेत. या सायबर पोलिस ठाण्यांसाठी नवीन मनुष्यबळाची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. याचा प्रस्ताव पुणे शहर पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला नुकताच पाठविला आहे.

एक हजार नवीन मनुष्यबळाची मागणी

पुणे शहरात नव्याने ७ पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यात ८५० मनुष्यबळ देखील मिळाले. परंतु, एकूण पोलिस ठाणे व लोकसंख्येचा विचार केल्यानंतर मनुष्यबळ अधिकच कमी आहे. त्यामुळे आणखी मनुष्यबळाची मागणी करण्यात येणार आहे. नव्याने ८५४ महिला व पुरूष कर्मचारी तसेच १०५ चालक असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सहाव्या झोनच्या निर्मितीस अडचणी

पुणे शहर पोलिस आयुक्तालयात लवकरच सहाव्या झोनची निर्मिती होणार आहे. त्याचे कामकाज सुरू आहे. परिमंडळ चार व पाच आणि परिमंडळ तीन यामध्ये सर्वाधिक पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे पोलीस उपायुक्तांचे येथील कामकाज वाढले आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनीधींच्या मतदार संघाचा विचार केल्यानंतर एकापेक्षा अधिक झोनमध्ये त्यांचा मतदार संघ समाविष्ठ आहे. त्यामुळे त्यांना विचारात घेऊन लवकरच सहाव्या झोनची (परिमंडळाची) निर्मिती करण्यात येणार आहे. झोनच्या निर्मितीमुळे पोलिसांच्या कामात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

Web Title: Pune police has sent a proposal demanding the creation of five new cyber police stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक
3

महाराष्ट्रातील नद्यांना आला महापूर; कृष्णामाई, नृसिंहवाडीसह अनेक देवदेवतांच्या चरणांना झाला अभिषेक

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
4

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.