Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज खून, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2026 | 01:24 PM
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
  • गुन्हेगारी रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय
  • गुन्हे शाखेची पुनर्रचना; प्रभावी कामकाज होणार
पुणे : पुणे शहर पोलिस दलात नुकतेच नव्याने पाच पोलिस ठाणी तसेच दोन परिमंडळे कार्यान्वित झाली आहेत. पोलिस ठाण्यांची संख्या तसेच वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच गुन्हेगारी नियत्रंण ठेवण्यासाठी आणि तपासाला गती देण्यास शहर गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. आजवर शहरात गुन्हे शाखेचे ६ युनिट होते. ते आता सात झाले असून, एक एसीपी पदही वाढविण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरात असलेल्या ७ परिमंडळसाठी ७ युनिट कार्यरत असणार आहेत.

 

शहरात ४४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या माध्यमातून गंभीर गुन्ह्यांवर लक्ष ठेवले जाते. गुन्हे शाखेअंतर्गत सहा युनिट्स, तसेच खंडणीविरोधी, अंमली पदार्थ विरोधी, आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी अशी प्रत्येकी दोन मिळून एकूण १२ पथके कार्यरत आहेत. ही सर्व पथके गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करत आहेत.

या नव्या पुनर्वाटपानुसार गुन्हे शाखेच्या चार एसीपींमध्ये जबाबदारींचे विभाजन केले आहे. त्यानुसार सहायक आयुक्त एक अंतर्गत युनिट एक ते तीन, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचा समावेश आहे. तर, एसीपी दोन अंतर्गत युनिट चार ते सात तसेच दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक दोन असेल. एसीपी तीन अंतर्गत खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथक एक आणि दोन यांचा समावेश आहे. तर, प्रशासन, भरोसा सेल, एएचटीयू (मानव तस्करी प्रतिबंधक युनिट) हे एसीपी चार यांच्या अखत्यारीत असणार आहे. नव्या बदलामुळे गुन्हे शाखेचे कामकाज अधिक समन्वयित, झोननिहाय आणि परिणामकारक होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : 5 कोटी रुपये द्या, नाहीतर…; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तरुण व्यवसायिकाला धमकी

परिमंडळनिहाय युनिट

पुणे शहरात सध्या ४४ पोलिस ठाणी आहेत. याचे विभाजन ७ परिमंडळात करण्यात आले आहे. त्यातच आता गुन्हे शाखेचे ७ युनिट झाल्याने प्रत्येक परिमंडळासाठी एक युनिट कार्यरत असणार आहे. तसेच, नव्या रचनेत खंडणी, अंमली पदार्थ विरोधी पथकासाठी एक एसीपी असणार आहे.

Web Title: Pune police has taken a big decision to curb the increasing crime in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
3

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.