Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची विक्री पिंपरीतील दुकानातून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने क्रीम जप्त केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 12:10 PM
पिंपरीत 'मेड इन पाकिस्तान' गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

पिंपरीत 'मेड इन पाकिस्तान' गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Follow Us
Follow Us:
  • पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री
  • दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
  • तब्बल 23 क्रीम केल्या जप्त
पिंपरी : भारतात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद केलेल्या ‘गोरी ब्यूटी क्रीम’ची विक्री पिंपरीतील दुकानातून होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने (एटीबी) बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) पिंपरीतील रिव्हर रोड परिसरात कारवाई करून १२ हजार ६५० रुपये किमतीच्या २३ क्रीम जप्त केल्या आहेत. याप्रकरणी विक्रेत्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश मनोहरलाल गुरु (वय ३९, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ‘गोरी ब्यूटी क्रीम’च्या भारतातील कंपनीचे अधिकृत तपासणी अधिकारी रईसोदीन इनामदार यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३ सप्टेंबर) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पिंपरी-चिंचवड विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिव्हर रोडवरील पीएमपीएमएल बस थांब्याजवळ असलेल्या शक्ती कॉस्मेटिक्स दुकानात ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद असलेल्या आणि भारतात विक्रीस परवानगी नसलेल्या बनावट गोरी ब्यूटी क्रीमची विक्री होत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार एटीबीच्या पथकाने पिंपरी पोलिसांच्या मदतीने दुकानात कारवाई केली आहे.

तपासणीदरम्यान दुकानात प्रत्येकी ५५० रुपये किमतीच्या २३ क्रीम आढळून आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत १२ हजार ६५० रुपये आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच कॉपीराइट कायद्याच्या कलम ५१ आणि ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अभिजीत केणे तपास करीत आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, अपर आयुक्त डॉ. बसवराज तेली आणि उपायुक्त धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेने पिंपरी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा : मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

पाकिस्तानातून वस्तूंच्या आयातीवर बंदी

केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या २ मे २०२५च्या अधिसूचनेनुसार पाकिस्तानातून भारतात सर्व प्रकारच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ‘मेड इन पाकिस्तान’ नमूद असलेल्या वस्तूंची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी पिंपरी-चिंचवड दहशतवाद विरोधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: A case has been registered against a person in pimpri for selling made in pakistan gori beauty cream

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
1

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त
2

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
3

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
4

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.