Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

पुणे शहरात घरफोड्यांच्या घटना घडत असताना विश्रामबाग पोलिसांनी डोक्यावर विग लावून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत शंकरसिंग जुनी याच्यासह चौघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 12, 2026 | 12:30 AM
डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात घरफोड्यांच्या घटना घडत असताना विश्रामबाग पोलिसांनी डोक्यावर विग लावून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत शंकरसिंग जुनी याच्यासह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३७ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, विश्रामबाग, विश्रांतवाडी, काळेपडळ आणि दत्तवाडी परिसरातील नऊ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी (वय.२७, रा. रामटेकडी हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगर (वय.२६, रा. बडोदा, गुजरात), अक्षयसिंग उर्फ अक्षय बिरुसिंग जुनी (वय.२२, रा.बिराजदार नगर हडपसर) आणि सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर ऊर्फ तीलपिटीया (वय.२२, रा. बडोदा, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शंकरसिंग उर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी हा सराईत गुन्हेगार असून, तो मुख्य आरोपी आहे. घरफोडी करताना ओळख पटू नये, यासाठी तो डोक्यावर बनावट केसांचा टोप (वीग) आणि तोंडावर मास्क लावत होता. त्याच्या वेशातील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान, विश्रामबाग पोलिस तपास करत असताना माहिती मिळाली की, घरफोडीच्या गुन्ह्यातील काही संशयित आरोपी उंड्री पिसोळीत आहेत. त्यानूसार, पथकाने या भागात सापळा रचला. त्यावेळी आरोपी कारने उंड्री पिसोळी येथील डोंगराच्या रोडने येत असल्याची माहती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिणे गुजरात येथील साथीदारांकडे ठेवले होते.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त रुषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, गुन्हे निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके, उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, कर्मचारी अनिस शेख, कैलास डुकरे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, महेश कदम यांच्या पथकाने केली.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नामी शक्कल

आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. घरफोडी करताना पोलिस आपल्याला पेहरावावरून ओळखतील याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी डोक्याला केसांचा विग लावला. तसेच तोंडाला मास्क लावले. सुरुवातीला पोलिस देखाल त्यांना ओळखण्यात फसले होते. पण, अचूक माहितीनंतर आरोपीला पकडण्यात यश आले.

हे सुद्धा वाचा  : पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

नाकाबंदीमुळे पळ काढण्यास घाबरले

अटक चोरट्यामध्ये दोघेण गुजरात येथील आहेत. तर दोघे पुण्यातील. घरफोडी केल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल दोघे आरोपी गुजरातला घेऊन जात होते. त्यामुळे अनेक घरफोड्या केल्यानंतर देखील ते पोलिसांच्या रडारवर आले नव्हते. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्यावेळी घरफोडी केल्यानंतर ते गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र शहरात ठिक-ठिकाणी नाकाबंदी असल्याची माहिती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचे नियोजन बदलले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Web Title: Pune police have arrested four individuals for committing burglaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • House Theft
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास
3

Pune Crime: विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; बंद घरातून ३० लाखांचे दागिने लंपास

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
4

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.