
पोलिसांची बेकायदेशीर शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या रॅकेटवर कारवाई
36 संशयित पुणे पोलिसांच्या ताब्यात
मध्यप्रदेशातील उमरटी गावातील ४ कारखाने उद्ध्वस्त
पुणे: पुणे पोलिसांनी मध्यप्रदेश येथे जाऊन बेकायदेशीर शस्त्रास्त्र पुरवठा करणा-या रॅकेटवर मोठी कारवाई करत ३६ संशयित ताब्यात घेण्यात आले. मध्यप्रदेशातील उमरटी गावातील ४ कारखाने उद्ध्वस्त केले असुन, या कारवाईत मध्यप्रदेश पोलिसांनी सहकार्य केले आहे. संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या या महत्त्वपुर्ण तपासात पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. मध्यप्रदेश येथील उमरटी येथील अवैध शस्त्रास्त्र पुरवठा व तस्करी करणारे रॅकेट उद्धवस्त केले आहे.
पुणे पोलिसांनी उमरटी गावातील ३६ संशयित ताब्यात घेण्यात आले असून बेकायदेशीर पिस्तुल बनवणाऱ्या ४ कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाई विषयी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली. ‘‘ पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात कॉम्बींग ऑपरेशन केले गेले हाेते. यावेळी आरोपीकडून ११ अग्निशस्त्रे तसेच यापुर्वी काळेपडळ पो. स्टे. येथील ४ अग्निशस्त्रे आणि विविध पोलिस स्टेशन येथे एकुण २१ पिस्तूल जप्त करण्यात आले होते.
Pune Police Transfer News: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदली; गुन्हे आणि वाहतूक शाखेत मोठा फेरबदल
बेकायदेशीर अग्निशस्त्राच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील तपासाच्या आधारे पोलिसांना ही शस्त्रे मध्यप्रदेशातून पुरविली गेल्याची माहीती पुढे अाली हाेती. मध्यप्रदेश येथील बडवाणी जिल्ह्यातील उमरटी गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रास्त्रे (अग्निशस्त्र) तयार करुन पुरवठा करुन आंतरराज्य तस्करी केली जाते, अशी माहीती पुढे आली हाेती. त्यानुसार पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-४) सोमय मुंडे यांचे नेतृत्वाखाली मध्यप्रदेश पोलीसांच्या सहकार्याने शनिवारी पहाटे कारखान्यांवर छापा टाकला गेला. बेकायदेशीर शस्त्रांच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या ३६ संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, असे रंजन कुमार यांनी नमूद केले.
या कारवाईत पुणे पोलिसांचा १०५ जणांचा ताफा सहभागी झाला हाेता. यात मोठ्या संख्येने शस्त्रे आणि शस्त्र बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच बेकायदेशीर शस्त्रांच्या मोल्डिंग आणि निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० भट्टया घटनास्थळीच नष्ट केल्या आहेत. अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रास्त्रे भरण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.आरोपींच्या चौकशीतुन आणि तांत्रिक पुराव्यांवरुन याठिकाणी उमरटी शिकलगार आर्म्स (युएसए) या ब्रॅंडच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती करुन त्याची तस्करी केली जात हाेती. या शस्त्रांची विक्री करण्याचे रॅकेट उमरटी या गावातुनच कार्यरत असुन त्या ठिकाणावरुन बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र तयार करुन, पुरवठा करुन आंतरराज्य तस्करी केली जाते.
Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता
बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करण्याच्या या साखळीचा शोध घेऊन अंतिम बेकायदेशीर शस्त्र प्राप्तधारकाची माहिती निष्पन्न करण्यासाठी तपास चालु आहे.तसेच या विशेष मोहिम दरम्यान पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे सुरक्षिततेकरीता क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी), आर्म व अॅम्युनिशनसह सोबत ठेवलेली होती. या कारवाई दरम्यान मोबाईल सर्व्हेलन्स व्हेईकल्स, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेट प्रुफ (बीपी) जॅकेट आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यासारख्या महत्त्वपुर्ण तांत्रिक सहाय्याचा देखील वापर करण्यात आल आहे अस देखील यावेळी त्यांनी सांगितले.