Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता वाहनचालकांना लागणार शिस्त; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबर त्याला शिस्त लावण्यासाठी आता पुणे पोलीस 'वाहतूक प्रशिक्षण संस्था' स्थापन करणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचारी, विद्यार्थी तसेच वाहतूक वॉर्डन यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2025 | 02:52 PM
आता वाहनचालकांना लागणार शिस्त; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

आता वाहनचालकांना लागणार शिस्त; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबर त्याला शिस्त लावण्यासाठी आता पुणे पोलीस ‘वाहतूक प्रशिक्षण संस्था’ स्थापन करणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचारी, विद्यार्थी तसेच वाहतूक वॉर्डन यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यासोबत बेशिस्त वाहन चालकांना देखील कारवाईसोबतच शिस्तीचे धडे दिले जाणार असून, पाच दिवस अशा वाहन चालकांना ट्रेनिंग देऊन नंतर त्याचे एक सर्टिफिकेटही दिले जाणार आहे. नंतर त्यांना त्यांचे वाहन परत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसेंदिवस तो आणखीनच गंभीर बनत चालला आहे. पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु, वाहतूक सुरळीत व कोंडी फुटत नसल्याचे वास्तव आहे. पोलीस कितीही प्रयत्न करत असले तरी बेशिस्त वाहन चालकांची संख्याही कमी होत नसल्याचे दिसत आहे. कारवाई केल्यानंतर देखील हे प्रमाण कमी होत नाही.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडून सातत्याने वाहतूक कोंडीसाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुणे पोलिसांकडून वाहतूक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामाध्यमातून पुण्याची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बेशिस्तांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या; खून झाल्याचा नातेवाईकांना संशय

असे केले जाणार कामकाज

  • वाहतूक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाणार.
  • संस्थेच्या पॅनेलमध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी, खासगी एक्सपर्टचा सहभाग
  • संस्थेकडून पोलीस कर्मचारी व विद्यार्थ्यांना वाहतूकीचे प्रशिक्षण दिले जाणार
  • वाहतूक नियोजनासाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार
  • बेशिस्त वाहन चालक (राँग साईड, ड्रँक अँड ड्राईव्ह, ट्रिपल शिट, उलटा प्रवास) करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार
  • बेशिस्तांना या संस्थेत पाच दिवस वाहतूक नियमनाचे धडे दिले जाणार, त्याचे सर्टिफिकेट मिळणार मग वाहन दिले जाईल
  • वाहतूक प्रशिक्षण संस्था तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न, त्यासाठी जागा व आवश्यक गोष्टीही कामकाज सुरू केले

दीर- भावजयचा मृत्यू

गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Pune police to start traffic training institute to discipline drivers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • pune news
  • Pune Police
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
1

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
2

पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी
3

ढोल ताशा पथकातील वादकांसाठी महत्वाची बातमी; शरीरावरील ताण कमी करण्यासाठी पाळा ‘या’ गोष्टी

Raj Thackeray in Pune traffic : पुण्याची वाहतूक कोंडी नेत्यांनाही सुटेना! ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा VIP ताफा
4

Raj Thackeray in Pune traffic : पुण्याची वाहतूक कोंडी नेत्यांनाही सुटेना! ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा VIP ताफा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.