Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

डॉ. बोराडे या चिंचवडच्या संभाजीनगर येथे कुटुंबियांसह राहतात. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ब्रह्माचीवाडी या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावात त्यांचा जन्म झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 12:06 PM
Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा दुर्गम खेड्यातून सुरू झालेला प्रवास, पायपीट करत घेतलेले शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले यश…ही कहाणी आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख तथा आरोग्य अधिकारी डॉ. नीना मधुकर बोराडे यांची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. बोराडे यांचा संघर्षमय प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

डॉ. बोराडे या चिंचवडच्या संभाजीनगर येथे कुटुंबियांसह राहतात. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ब्रह्माचीवाडी या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या काळात गावात वीज नव्हती, बससेवा नव्हती आणि मूलभूत सुविधांचाही अभाव होता. वडील शिक्षक, आई गृहिणी आणि पाच भावंडे अशा कुटुंबात त्यांचे बालपण गेले. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी मुलींचे शिक्षण थांबण्याची वेळ येत असे. मात्र, डॉ. नीना यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. पाचवी ते सातवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहा येथे रोज पायी प्रवास करत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कळंब येथे आठवी ते बारावीचे शिक्षण घेत त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. पुढे लातूर येथील एमआयटी महाविद्यालयातून एमबीबीएस आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी (पीएसएम) पदवी मिळवत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.

१९९८ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील वालवड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. ग्रामीण भागात काम करताना त्यांनी कुपोषण निर्मूलन, बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमा आणि आरोग्य जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले. मंगरूळपीर येथे कोविड काळात जम्बो कोविड सेंटरच्या प्रभारी म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. नांदेड येथे जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी म्हणून काम करताना किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ हा उपक्रम राबवून रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सध्या त्या २६ जुलै २०२४ पासून पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख तथा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी रुग्णालयांचे आधुनिकीकरण, बाल लसीकरण, रेबीज नियंत्रण आणि कुटुंब कल्याण यांसारख्या विविध योजनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे.

ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्यामुळे त्यांनी प्रशासकीय पदाला केवळ नोकरी न मानता जनसेवेची संधी मानली. उच्च पदावर असूनही जमिनीशी नाळ जोडून ठेवत प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिद्द, परिश्रम आणि सेवाभावाच्या बळावर घडलेला त्यांचा प्रवास आज अनेक महिलांना मोठी प्रेरणा देणारा ठरत आहे.

हेदेखील वाचा : Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व

Web Title: Womens day special dr neena borade studied by walking ten kilometers in village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • pune news
  • womens day

संबंधित बातम्या

उन्हाळी सुट्टीत बालसाहित्यास नवी उभारी; वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रमांची मेजवानी
1

उन्हाळी सुट्टीत बालसाहित्यास नवी उभारी; वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रमांची मेजवानी

पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?
2

पुणे महापालिकेतील सभागृहाच्या कामकाजावरून विरोधक आक्रमक; सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?

पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी! सांस्कृतिक पुण्याचा नवा ‘कळस’
3

पेठांमधील सुरावटी आता कोथरूड-कर्वेनगरच्या अंगणी! सांस्कृतिक पुण्याचा नवा ‘कळस’

पुणे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत; टॅंकर पॉईंटही बंद, नागरिकांना करावी लागली कसरत
4

पुणे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत; टॅंकर पॉईंटही बंद, नागरिकांना करावी लागली कसरत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.