
Pune Crime: '...या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो'; पुण्यातील 'या' प्रकरणातील आरोपी नेमके काय म्हणाला?
पुणे: पुण्याच्या रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. शुभदा शंकर कोदारे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (याला अटक केली. आता या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने महत्वाची गोष्ट सांगितली आहे.
येरवडा परिसरातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे या तरुणीचा सहकारी कृष्णा कनोजिया या तरुणाने आर्थिक वादातून खून केल्यानंतर या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आता कृष्णाच्या चौकशीत त्याने “शुभदा मी तिला दिलेले पैसे वारंवार मागूनही परत देत नव्हती. मी तिला चाकूने धमकविल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलीस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील, या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो. पण या हल्ल्यात तिचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते असे म्हंटले आहे.
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खूनप्रकरणी गुन्हा नोंद आहेत. न्यायालयाने कृष्णा कनोजियाला न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यात या हत्याप्रकरणाचा संपूर्ण तपशील समोर येत आहे.
हेही वाचा: Pune Crime: ‘ती’ तडफडत होती पण कोणीच…, पुण्याच्या आयटी कंपनीतील भयानक VIDEO आला समोर
दुसरीकडे ती पैसेही परत देत नव्हती. त्यातून त्यांचे वाद होत असत. तर शुभदा कोदारे हिनेच सहकारनगर पोलीस ठाण्यात कृष्णा त्रास देतो अशी तक्रार दिली होती. पोलिसांनी कृष्णाला ठाण्यात बोलावून समज दिली होती. त्यामुळे कृष्णा हा शुभदावर चिडून होता. मंगळवारी सायंकाळी शुभदा कामाला येण्यासाठी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली असताना कृष्णाने धारदार चाकूने तिच्या हातावर पाच वार केले. हल्ल्यात मोठया प्रमाणावर रक्तस्राव झाला. शुभदा हिला लो शुगरचा त्रास होता.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय?
कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शुभदा म्हणजेच जिची हत्या झाली आहे. ती स्पष्टपणे दिसत आहे. ती त्यामध्ये जमिनीवर बसल्याचे दिसून येत आहे. कृष्णा कनोजियाणे आर्थिक वादातून तीची हत्या केली आहे. त्या व्हीडिओत चक्क कृष्णा हातात सूरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालताना दिसतोय. ज्यावेळेस कृष्णा तिच्या भोवती हातात सुरा घेऊन फिट आहे. तेव्हा त्यांच्या बाजूने असंख्य लोकांची गर्दी पहायल मिळत आहे.