Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात; किराणा घराण्याच्या…; PMP देणार विशेष सेवा

महोत्सवाचे प्रथम स्वरपुष्प दिल्लीस्थित लोकेश आनंद यांनी अर्पण केले. कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांचा परंपरागत वारसा जपत त्यांनी सनईवर राग ‘मुलतानी’ सादर केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 10, 2025 | 08:34 PM
सनईच्या मंगल सुरावटींनी 'सवाई गंधर्व महोत्सवा'ची सुरुवात; किराणा घराण्याच्या...; PMP देणार विशेष सेवा

सनईच्या मंगल सुरावटींनी 'सवाई गंधर्व महोत्सवा'ची सुरुवात; किराणा घराण्याच्या...; PMP देणार विशेष सेवा

Follow Us
Close
Follow Us:

सनईच्या मंगल सुरावटींनी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात
पाच दिवसीय महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात होणार 
गेली ५१ हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु

पुणे: सनईच्या मंगल सुरावटी आणि कंठसंगीतासह वादनाचा सहजसुंदर आविष्काराच्या साक्षीने ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची बुधवारी उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटनाच्या क्षणीच संगीतमय भावावस्था निर्माण करणाऱ्या सनईवादक लोकेश आनंद आणि किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची पहिली संध्या अविस्मरणीय ठरली. आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित हा पाच दिवसीय महोत्सव यंदा मुकुंदनगर (Pune) येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात रंगत आहे. सुमारे दहा हजार रसिकांना सामावणाऱ्या या संकुलात दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहून स्वरनंदनवनाची नांदी झाली.

महोत्सवाचे प्रथम स्वरपुष्प दिल्लीस्थित लोकेश आनंद यांनी अर्पण केले. कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांचा परंपरागत वारसा जपत त्यांनी सनईवर राग ‘मुलतानी’ सादर केला. विलंबित एकतालातील विस्तार, त्यानंतर गुरू पं. जसराज यांच्या ‘आये मोरे साजनवा’ चे द्रुत सादरीकरण आणि केहरवा तालातील बनारसी धूनने रसिकांची दाद मिळवली. त्यांना पंडुरंग पवार (तबला) आणि केदार जाधव (सहशहनाई) यांनी प्रभावी साथ दिली.

यानंतर स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या डॉ. चेतना पाठक यांनी राग ‘भीमवंती’चे माधुर्य खुलवले. ‘गाऊ मै हरीनाम’पासून ‘लागे मोरे नैन’ आणि तराणा या त्रिताल–एकताल रचनांच्या उत्तुंग सादरीकरणाने सभागृह भारावले. ‘बलमा ने चुराई निंदिया’ या दादऱ्याने त्यांनी सादरीकरणाला मोहक विराम दिला. अमेय बिच्चू (हार्मोनिअम), पंडुरंग पवार (तबला) आणि तानपुरा वादकांच्या साथीत त्यांचे गायन अधिक खुलले.

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

पहिल्या दिवशी रितेश–रजनीश मिश्रा यांचे युगल गायनही विशेष ठरले. सादरीकरणा आधी मिश्रा बंधूनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली. पंडित अरविंद कुमार आजाद (तानपुरा), अक्षय जोशी आणि विशाल व्यास (तबला) यांच्या संगतीने त्यांनी मिश्रा बंधूंच्या परंपरेला साजेशी उंची दिली. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख यांनी केले.
बस सेवेची सुविधा
महोत्सवाला येणाऱ्या रसिकांच्या परतीची सोय लक्षात घेऊन पीएमपीएमएलतर्फे विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महोत्सव संपल्यानंतर रात्री १०:३० वाजता मुकुंदनगरहून निगडी, धायरी, कोथरूड डेपो आणि वारजे माळवाडी या मार्गांवर बस सुटतील. तसेच अधिक गर्दीची शक्यता लक्षात घेता शनिवार, १३ डिसेंबर रोजी रात्री १२:३० वाजता अतिरिक्त बसची सोयही करण्यात आली आहे.
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण 
परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला. गेली ५१ हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. याप्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, विश्वस्त शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं उपेंद्र भट, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, पद्मा देशपांडे, आनंद भाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The 71st sawai gandharva bhimsen music festival began with enthusiasm on wednesday mukundnagar pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Cultural Event
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?
1

गणेश भक्तांसाठी मोठी बातमी! पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर 15 डिसेंबरपासून राहणार बंद; कारण काय?

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध
2

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
3

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
4

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.