पुण्याच्या IT कंपनीतील हत्येचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे: पुण्याच्या रामवाडीत येथील नामांकित कंपनीच्या पार्किंगमध्ये सहकारी तरुणीवर धारधार हत्याराने केलेल्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आर्थिक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघेही या कंपनीत अंकाऊटिंग विभागात काम करत होते. शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. कात्रज) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा सहकारी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय ३०, रा. खैरेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर) याला अटक केली. आता या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
साडे चार लाखांचा व्यवहार
दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांची चांगली ओळख होती. तरुणी घरात मोठी होती. तिला एक लहान बहिण आहे. कृष्णा याच्या घरात त्याला मोठे तीन भाऊ आहेत. तो लहान आहे. दरम्यान, कृष्णा याने तरुणीला साडे चार लाख रुपये हात उसने म्हणून दिले होते. तरुणीने ते काही कौटुंबिक अडचणीमुळे लागत असल्याचे सांगितले होते. कृष्णा तिला पैसे परत मागत होता. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती.
हेही वाचा: ‘त्या’ तरुणीच्या खुनाचं धक्कादायक कारण समोर; आरोपीला ठोकल्या बेड्या
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की काय?
कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शुभदा म्हणजेच जिची हत्या झाली आहे. ती स्पष्टपणे दिसत आहे. ती त्यामध्ये जमिनीवर बसल्याचे दिसून येत आहे. कृष्णा कनोजियाणे आर्थिक वादातून तीची हत्या केली आहे. त्या व्हीडिओत चक्क कृष्णा हातात सूरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालताना दिसतोय. ज्यावेळेस कृष्णा तिच्या भोवती हातात सुरा घेऊन फिट आहे. तेव्हा त्यांच्या बाजूने असंख्य लोकांची गर्दी पहायल मिळत आहे.
https://twitter.com/brizpatil/status/1877274806233481384
मात्र आरोपीच्या हातामधील भलामोठा सुरा पाहून कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बघ्यांच्या गर्दीने जरा धाडस करून जर त्या आरोपीला तिच्यापासून दूर करण्याचे प्रयत्न केले असते, तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे सोशल मिडियावर या गर्दी केलेल्या लोकांना देखील सुनावले जात आहे. दरम्यान आरोपीने हातातील सुरा फेकून दिल्यानंतर बाजूला नुसते पाहत बसणाऱ्या लोकांनी आरोपीला पकडले व त्याला चांगलाच झोप दिला. मात्र हे सगळे घडेपर्यंत शुभदाचे प्राण गेलेले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी मुळ चिपळूण येथील आहे. ती कुटूंबियासोबत साताऱ्यात स्थाईक झाली होती. तर आरोपी कृष्णा हा मुळचा उत्तरप्रदेशातील आहे. तो गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे त्याला मराठी व्यवस्थित बोलता येते.
दरम्यान, दोघेही डब्ल्युएनएस या कॉल सेंटर असलेल्या कंपनीत काम करत होते. दरम्यान, त्यांच्यात काही पैशांची देवाण-घेवाण झाली होती. त्यावरून त्यांच्यात वादावाद देखील होते. तरुणीकडून कृष्णा पैसे मागत होता. मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास तरुणी काम संपवून पार्किंगमध्ये आली. ती तिच्या वाहनाने जाणार असतानाच तेथे थांबलेल्या कृष्णाने तरुणीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने थेट भाजी कापण्याच्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तरूणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.






