
Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या...
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगर येथील ‘अक्षय हाइट्स’ सोसायटीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये सोमवारी पायल झांबरे यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पायल या एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीला होत्या. पाच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह अक्षय झांबरे यांच्याशी झाला होता आणि या दाम्पत्याला चार वर्षांची लहान मुलगीही आहे.
पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सासरच्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दरवर्षी दिवाळीच्या सणाला सासरच्या मंडळींकडून ५ ते १० तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदाच्या दिवाळीत माहेरच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी “पुढील वर्षापर्यंत थांबा, आम्ही मागणी पूर्ण करू” अशी विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही सासरच्यांकडून पायल यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला आणि त्यांचा कौटुंबिक छळ सुरूच राहिला, असा आरोप पवार यांनी केला आहे.
घटनास्थळी माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून पायल यांचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजचीही पोलीस कसून तपासणी करत आहेत. हा आत्महत्याचा प्रकार आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
Ans: मृत महिलेचे नाव पायल अक्षय झांबरे (वय २९) असून त्या एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या.
Ans: सासरच्या मंडळींकडून दरवर्षी दिवाळीत ५ ते १० तोळे सोन्याची आणि हुंड्याची मागणी करून पायल यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
Ans: स्वारगेट पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला असून, फॉरेन्सिक पंचनामा आणि इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल तपास सुरू आहे.