Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

अवैध दारू व्यवसायाविरोधात बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सोनगाव येथील पारधी वस्ती परिसरात सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 05:10 PM
सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश
  • हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
  • अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार
बारामती : अवैध दारू व्यवसायाविरोधात बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत सोनगाव येथील पारधी वस्ती परिसरात सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि सुमारे १०० लिटर कच्चे रसायन (वॉश) जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 

२८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना सोनगाव येथील पारधी वस्तीमध्ये अवैध हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी, कच्चे रसायन आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरील रसायन नष्ट करून हातभट्टी उद्ध्वस्त केली. या व्यवसायातून परिसरात अवैध दारूची निर्मिती व विक्री केली जात असल्याचा संशय आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिंदे, हेड कॉन्स्टेबल पवार, देशमाने, खरातडे, खटके, वाघमारे कदम, खैरे, पोमणे, तरंगे आणि कांबळे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बारामती पथकानेही या कारवाईत सहभाग घेतला. विभागाचे उपअधीक्षक गणेश कसरे, निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक सागर साबळे यांच्यासह गिरीश कुमार करचे, मनोज होलेम, प्रदीप झुंजुरके, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, प्रदीप मोहिते, प्रणव मेहता, शितल शिंदे, सुनील वाघ, दिनेश सूर्यवंशी, विनोद शिंदे, विनोद इंजे, चरण कुंठे व अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग नोंदविला.

हे सुद्धा वाचा : चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!

अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार

बारामती तालुका पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईमुळे अवैध हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत. परिसरात अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांनी हातभट्टीवर कुठे कारवाई केली?

    Ans: बारामती तालुक्यातील सोनगाव येथील पारधी वस्ती परिसरात कारवाई केली.

  • Que: या कारवाईत काय जप्त करण्यात आले?

    Ans: सुमारे १०० लिटर कच्चे रसायन (वॉश) आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

  • Que: कारवाईदरम्यान किती जणांना ताब्यात घेतले?

    Ans: पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Web Title: The police have taken major action against the illegal liquor trade in songaon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Arrested News
  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!
1

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
2

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ
3

चारित्र्याच्या संशयातून झोपेतच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; वाशिममधील घटनेनं खळबळ

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

पोटच्या लेकरांना जंगलात नेऊन संपवले; आईला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.