Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

Nagpur News : दिवाळीपूर्वी शहरातील ८ ते १० सराफा व्यापाऱ्यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीची पत्रे पाठवण्यात आली आहेत. प्रत्येकाकडे १० लाखांची खंडणी मागण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 02, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • तीन ते पाच दिवसांची मुदत; हल्ल्याचाही इशारा
  • मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू
  • खंडणीच्या पत्रांमुळे सराफा बाजारात खळबळ
Nagpur News : दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सराफा बाजारात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील आठ ते दहा सराफा व्यापाऱ्यांना कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने खंडणीची धमकी देणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत.

प्रत्येक व्यापाऱ्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्यासह गंभीर स्वरूपाच्या हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, धमकी देण्यासाठी फोन किंवा ऑनलाइन संदेशाचा वापर न करता थेट टपालाद्वारे पत्रे पाठवण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन ते पाच दिवसांची मुदत; हल्ल्याचाही इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्यांना मिळालेल्या पत्रांमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख करून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. काही व्यापाऱ्यांना खंडणीची रक्कम देण्यासाठी तीन दिवसांची, तर काहींना पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे. निर्धारित वेळेत पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पत्रांमधून देण्यात आला आहे.

या पत्रांमधील धमकी अधिक गंभीर मानली जात आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणेच व्यापाऱ्यांवरही हल्ला करण्याची धमकी दिल्याचे समजते. तसेच खंडणीची रक्कम देण्याची तयारी असल्यास दुकानाबाहेर ‘जय श्रीराम’ असे लिहावे, असा संदेशही पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडून संपर्क साधला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (GJC) राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रोकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडेही या प्रकाराची माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सराफा व्यापाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून द्यावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी व्यापाऱ्यांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धमकीचे पत्र, फोन किंवा संदेश प्राप्त झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही पत्रे नेमकी कोणी पाठवली, त्यामागे कोणाचा हात आहे आणि लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. टपालाद्वारे आलेल्या या धमकीपत्रांमुळे सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत

खंडणीच्या पत्रांमुळे सराफा बाजारात खळबळ

दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सराफा बाजारात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील आठ ते दहा सराफा व्यापाऱ्यांना कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने खंडणीची धमकी देणारी पत्रे पाठवण्यात आली आहेत. प्रत्येक व्यापाऱ्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्यासह गंभीर स्वरूपाच्या हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, धमकी देण्यासाठी फोन किंवा ऑनलाइन संदेशाचा वापर न करता थेट टपालाद्वारे पत्रे पाठवण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Lawrence bishnoi extortion threat gold jewellers diwali cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • crime news
  • Lawrence Bishnoi
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान
1

Kirtan Movie Poster Launched: ‘कीर्तन’ चित्रपटाचे दिमाखात पोस्टर लाँच; सोहळ्यात सामाजिक संस्थांना 2 कोटींचे दान

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन
2

lokshahir Vitthal Umap: लोककलेचा स्वर, आठवण लोकशाहीरांची! विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृती संगीत समारोहाचे आयोजन

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher
3

धनतेरसचा मुहूर्त साधा! Instamart वर सोन्याची नाणी आणि चांदीच्या नाण्याएवढा Voucher

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर
4

Nagpur News : दिवाळीत घरी येणे महागणार हवाई प्रवासाचे भाडे ११ ते १७ हजारांवर; बसचे तिकीटही ५ हजारांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.