Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाईन ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिहारमधील पाटण्यातून दोन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 11:43 AM
आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील खराडी भागात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या
  • आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी केला उलगडा
  • दोघांना ठोकल्या बेड्या
पुणे : पुण्यातील खराडी भागात राहणाऱ्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला ऑनलाईन ब्लॅकमेल करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिहारमधील पाटण्यातून दोन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एकाच खोलीत बसून लोकांची ब्लॅकमेलिंग करत होते. यातील एक आरोपी सोशल मीडियावर मुलगी बनून गप्पा मारत असे, तर दुसरा आरोपी पोलिस अधिकारी बनून ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत असे. याच पद्धतीने आरोपींनी खराडी येथील रहिवासी असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला पावणे दोन लाख रुपयाला गंडा घातला आहे.

 

शिखर गौरव सक्सेना (वय २२) याच्याकडून ५ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे १ लाख ७७ हजार रुपये उकळले होते. सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासामुळे नैराश्यात आलेल्या शिखरने १ ऑक्टोबर रोजी खराडी येथील एका इमारतीच्या २७ व्या मजलवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आकाशकुमार संजय सिंह (वय १८ वर्षे २ महिने, रा. गोपाळगंज, बिहार) आणि राजकुमार संपूर्णानंद सिंह (वय २२, रा. बांका, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कसे चालत होते ब्लॅकमेलिंगचे रॅकेट ?

आरोपींनी इन्स्टाग्रामवर तरुणींच्या नावाने बनावट खाती तयार केली होती. त्यापैकीच एका खात्यावरून शिखर सक्सेनाशी संपर्क साधला. संवाद वाढल्यानंतर आरोपींनी त्याला टेलिग्रामवर येण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉल सुरू असताना एक अश्लील व्हिडिओ दाखवून त्या कॉलचे रेकॉर्डिंग करण्यात आले. याच रेकॉर्डिंगच्या आधारे शिखरला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात झाली. व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची आणि ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी आरोपी देत होते. एवढेच नव्हे तर, फोनवर पोलिस अधिकारी असल्याचे भासवूनही त्याला भीती दाखवण्यात आली. या सततच्या धमक्यांमुळे घाबरून शिखरने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १ लाख ७७ हजार रुपये पाठवले होते.

अशी उघडकीस आली घटना 

शिखर ३० सप्टेंबर रोजी खराडी येथील घरातून बाहेर पडला होता. तो परत न आल्याने खराडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद केली होती. दुसऱ्या दिवशी, सकाळी साडेसहाच्या सुमारास शिखरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या दुर्घटनेनंतर शिखरचे वडील कुमार गौरव सक्सेना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. वडिलांच्या तक्रारीवरून १४ ऑक्टोबर रोजी खराडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तांत्रिक तपासाच्या आधारे बिहारमधून मुसक्या आवळल्या

या प्रकरणाचा तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलिस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे आणि तांत्रिक विश्लेषक पोलिस कर्मचारी सूरज जाधव यांनी तपासणी केली. दरम्यान आरोपी बिहारमधील गोपाळगंज आणि पटना येथील दानापूर भागात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले. चार दिवस शोध घेतल्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दानापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई पूर्ण केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुण्यात आणून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हे सुद्धा वाचा : चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल

आरोपींची चौकशी केली असता त्यांच्या इतर साथीदारांची नावेही समोर आली आहेत. यामध्ये पंजाबच्या लुधियाना येथील अनिकेत गुप्ता आणि खंडणीची रक्कम स्वीकारणारा अरुणाचल प्रदेश येथील कृष कुमार यांचा समावेश आहे. असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला किती रुपयांची खंडणी मागण्यात आली होती?

    Ans: आरोपींनी शिखर गौरव सक्सेना याच्याकडून पाच वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे एकूण १ लाख ७७ हजार रुपये उकळले होते.

  • Que: आरोपी तरुणाला कोणत्या पद्धतीने ब्लॅकमेल करत होते?

    Ans: आरोपींपैकी एकाने इन्स्टाग्रामवर तरुणी बनून शिखरशी मैत्री केली. त्यानंतर टेलिग्रामवरील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दुसऱ्या आरोपीने पोलिस अधिकारी बनून ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी किती आरोपींना अटक केली आणि ते कुठून पकडले?

    Ans: पुणे पोलिसांनी बिहारमधील पाटणा आणि गोपाळगंज परिसरातून आकाशकुमार संजय सिंह आणि राजकुमार संपूर्णानंद सिंह या दोन आरोपींना अटक केली.

Web Title: The police have arrested two people for abetting a young mans suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका
1

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत
2

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
3

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.