Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

Payal Jhambre Suicide: पुण्याच्या मुकुंदनगरमधील त्या रात्री नक्की काय घडलं? एकीकडे सॉफ्टवेअर इंजिनिअर पायल झांबरेचा हसतखेळतं कुटुंब असताना, अचानक संपत्तीसाठी सुरू झालेला भयानक छळ अन् मृत्यूच्या दोन दिवस आधीचा तो वाद... पायलच्या गूढ मृत्यूमागे सासरच्या मंडळींचा नेमका कोणता काळाबाजार होता?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 04, 2026 | 01:25 PM
Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

Follow Us
Follow Us:
  • पायल झांबरेची सासरच्या त्रासामुळे आत्महत्या
  • पती अक्षय झांबरे अटकेत, इतर आरोपी फरार
  • संपत्ती आणि प्लॉटसाठी सासरच्यांकडून छळ
Payal Jhambre Suicide: पुण्यातील मुकुंदनगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. २९ वर्षीय विवाहित तरुणी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पायल झांबरे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत पायलचा पती अक्षय झांबरे याच्यासह सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत पती अक्षय झांबरेला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, सासू-सासरे आणि नणंद अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा: Lonavala Tiger Point: मुसळधार पाऊस, ४०० फूट खोल दरी आणि एक फोन call; लोणावळ्यातील ‘त्या’ रात्रीचं थरारक रहस्य!

“माझी मुलगी गिळली, काळजाचा तुकडा हिरावला”

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या उच्चशिक्षित पायलने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पायलच्या कुटुंबीयांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत. “माझी मुलगी गिळली, आमच्या काळजाचा तुकडा हिरावला,” अशा शब्दांत पायलच्या वडिलांनी आपला आक्रोश व्यक्त केला. लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासूनच सासरच्या मंडळींकडून पायलचा छळ सुरू झाल्याचा दावा वडिलांनी केला. पाहुण्यांसाठी हॉटेल बूक केले नाही आणि चांदीच्या वस्तू दिल्या नाहीत, या क्षुल्लक कारणांवरून तिला सतत लक्ष्य केले जात होते.

हेही वाचा: Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

सातारा रस्त्यावरील प्लॉट आणि संपत्तीच्या हव्यासापोटी छळ

कुटुंबातील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व वाद संपत्तीच्या कारणावरून टोकदार झाला होता. वडीलांच्या संपत्तीत हिस्सा घेण्यासाठी आणि सातारा रस्त्यावरील प्लॉट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पायलवर प्रचंड दबाव टाकला जात होता. मृत्यूच्या दोन दिवस आधीच सासूने पायलसोबत मोठा वाद घातला होता. “पायल अशी टोकाचं पाऊल उचलणारी मुलगी नव्हती, सासू आणि नवऱ्यानेच ही परिस्थिती निर्माण केली,” असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवऱ्याने पायलचे केस पकडून तिला पायऱ्यांवरून खाली ओढत नेले होते आणि बेदम मारहाण केली होती, अशी माहितीही समोर आली आहे. नवरा पूर्णपणे आईच्या आहारी गेला होता आणि आई सांगेल तसेच करत होता, असे सांगत कुटुंबीयांनी झांबरे कुटुंबावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पायल झांबरेच्या मृत्यूप्रकरणी कोणाकोणावर गुन्हे दाखल झाले आहेत?

    Ans: या प्रकरणी मृत पायलचा पती अक्षय झांबरे याच्यासह तिची सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक झाली आहे.

  • Que: पायलच्या आत्महत्येमागे संपत्तीचा कोणता वाद समोर आला आहे?

    Ans: सातारा रस्त्यावरील एक प्लॉट पायलच्या वडिलांकडून तिच्या नावावर किंवा सासरच्यांच्या नावावर करून घेण्यासाठी सासरच्या मंडळींकडून सतत दबाव टाकला जात होता आणि त्यातूनच हा वाद टोकाला गेला होता.

  • Que: पतीशिवाय इतर आरोपींची सध्या काय स्थिती आहे?

    Ans: पती अक्षय झांबरेला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सासू, सासरे आणि नणंद हे सर्वजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune mukundnagar payal jhambre suicide case husband arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • pune crime case
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!
1

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
2

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख
3

Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी
4

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.